हिमायतनगर| तालुक्याच्या बॉर्डरवर असलेल्या हिमायतनगर वनपरिक्षेत्रातील पाणवठे आटल्यामुळे वन्यप्राणी शेतशिवार आणि गाव परिसराकडे येत आहेत. त्यामुळे उन्हाळी पिके नुकसानीत आली असून, गावातील नागरिकही वन्यप्राण्यामुळे हैराण झाले आहेत. वनविभागाने तातडीने जंगलातील प्राण्यांची तहान भागविण्यासाठी पाणवठे तयार करावे अशी मागणी वन्यप्रेमी नागरीकातून केली जात आहे.
हिमायतनगर तालुक्याच्या काठावर विदर्भ हद्दीत आणि तेलंगणा हद्दीत जंगल आहे. पावसाळ्यात जंगलातील झाडे झुडपे असल्याने या जंगलात, रोही, हरण, ससे, मुंगूस, साप, हरी, मोर, आदींसह वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. सध्या उन्हाच्या झळा वाढत असल्याने पानगळी होऊन जंगल परिसर भकास झाले आहे. तसेच जंगलातील पाणवठे असल्यामुळे वन्यप्राणी गावकुशीकडे वळत आहेत.
वन्यप्राणी शेती-गाव शिवरातील शेतीकडे आगेकूच होत असल्याने शेतकरी, नागरिक हैराण झाले आहेत. तालुक्यातील मौजे कारला (पी.), बोरगड़ी, धनोरा शिवार नदीकाठ परिसरात असल्याने इकडील शेती हिरवीगार आणि पाणी असल्याने गेल्या काही दिवसापासून या भागातील शेती शिवारात रोही आणि हरणांच्या कळपानी धुमाकूळ माजविला आहे.
वन्यप्राण्यांच्या धुमाकुळामुळे शेतकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, उन्हाळी पिकेही नुकसानाची आली आहेत. एवढेच नाहीतर लाल आणि काळ्या माकडांचे कळप काही ठिकाणी शेतकऱ्यावर हल्ला करत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. या प्रकाराकडे वन विभागाने पाण्याच्या टंचाईने गावकुशीकडे येणाऱ्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करून शेतकरी नागरिकांना सुरक्षा द्यावी अशी मागणी होत आहे.