नवीन नांदेड| केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लावण्याचे काम सुरु केले आहे. पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल यासह अनेक वस्तुचे भाव गगनाल भिडले आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वसामान्य नागरिक महागाईत होरपळत आहे. या महागईच्या उंच्चाक पहाता केंद्रसरकारचे अभिनंदन करण्याच्या हेतुने नांदेड दक्षिण युवासेनेचे जिल्हाप्रमुख व्यंकटेश मामीलवाड यांनी दि ३ एप्रिल रोजी इंधनदरवाढी विरोधात हडको येथील श्रिकर पेट्रोल पंपावर थाळी वाजवत "थाली बजाओ,खुशीयां मनाओ" अनोखे आंदोलन केले .
केद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, घरगुती गँस, खाद्यतेल यासह असंख्य जिवनाअवश्यक वस्तुचे दरवाढ करत सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लावली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता हि महागाईच्या आगीत होरपळत आहे. केंद्र सरकारच्या दरवाढीच्या विरोधात युवासेनेचे प्रमुख आदित्यजी ठाकरे, युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली राज्यात युवासेनेच्या माध्यमातून केंद्र सरकारचे अभिनंदन करण्याहेतूने "थाली बजाओ,खुशीयां मनाओ" हे आंदोलन करण्यात येत आहे.
नांदेड जिल्ह्यातील नांदेड दक्षिण विधानसभा,नायगाव तालुका,उमरी तालुका व धर्माबाद तालुक्यातील युवासेनेच्यावतीने युवासेना विस्तारक अमित गिते आणि युवासेना जिल्हाप्रमुख व्यंकटेश मामीलवाड यांच्या नेतृत्वाखाली दि ३ एप्रिल रोजी नांदेड - उस्माननगर रस्त्यावरील श्रीकर पेट्रोल पंपावर धाली बाजवत केंद्र सरकारच्या महागाई विरोधात "थाली बजाओ,खुशीयां मनाओ" आंदोलन करण्यात आले . यावेळी मामीलवाड यांनी आगामी काळात महाराष्ट्रातील जनता ह महागाईचा भडका केंद्र सरकारला मतदानाच्या माध्यमातून दाखवून त्यांना त्यांची जागा दाखवून देईल असे प्रतिपादन व्यंकटेश मामीलवाड यांनी केले.
यावेळी नांदेड दक्षिण माजी उपजिल्हा युवाधिकारी अक्षय वट्टमवार,संतोष देशमुख,आनंद घोगरे,पप्पू गायकवाड,नायगाव येथे युवासेना समन्वयक ओमप्रकाश धुप्पेकर,उमरी येथे माजी तालुका युवाधिकारी बालाजी पवार,धर्माबाद येथे यश मोकलीकर, दिलीप लिंगमपल्ले याच्यासह युवासैनिकाची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती .