उमरी/ नांदेड| महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भागवताचार्य परमपूज्य अनंत महाराज बेलगावकर यांच्या नर्मदा परिक्रमेला शुक्रवारी दिनांक 15 एप्रिल रोजी सुरुवात झाली असून जवळपास चार हजार किलोमीटरची परिक्रमा ते बसने २२ दिवसात पूर्ण करणार आहे. दरम्यान नर्मदा परिक्रमेतील शूलपाणीच्या जंगलात आदिवासी बांधवासाठी महाप्रसाद व कपडे वाटप करण्यात येणार आहेत.
भागवताचार्य अनंत महाराज बेलगावकर यांनी महाराष्ट्रात झालेल्या त्यांच्या भागवत कथेच्या माध्यमातून रुक्मिणीसयंवरच्या दिवशी भाविकांना कपडे आणण्याचे आवाहन करतात त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत असंख्य भाविकांनी कपडे जमा करतात. जवळपास दहा ते पंधरा लाख रुपयांचे कपडे नर्मदा परिक्रमेच्या माध्यमातून आदिवासी व गोरगरीब बांधवांना सदरील कपडे वाटप केले जातात. गेल्या अनेक वर्षापासून असा हा नावीन्यपूर्ण उपक्रम आजही अविरतपणे सुरू आहे. बेलगावकर महाराज यांनी दोन वेळा पायी नर्मदा परिक्रमा केली असून चार ते पाच वेळा वाहनाने परिक्रमा केली आहे. वाहनाने परिक्रमा करताना ते जंगलातील असंख्य बांधवांना कपडे वाटप करतात.
यंदाची त्यांची ही नर्मदा परिक्रमा दिनांक 15 एप्रिलपासून सुरू झाली असून दिनांक 3 मे पर्यंत परिक्रमा असेल. या परिक्रमेला परमपूज्य अनंत महाराज बेलगावकर यांच्यासमवेत किरण महाराज कहाळेकर, पंकज भंडारी, बालाजी वाघमारे, ज्ञानेश्वर गंगावार, गंगाधर दमकोंडवार, विठ्ठलराव आटाळेकर, दिंकरराव जोशी त्यांच्याशी 50 नर्मदा फक्त नर्मदा परिक्रमेला रवाना झाले असून त्यांना निरोप देण्यासाठी दिगंबर लापशेटवार, नरेश सोमावार अविनाश मारमवार, डॉ. गोपाळ महाजन, गोविंद महाराज, सूर्यकांत गुंडाळे, सुनील कामिनवार, बंडू सावकार वट्टमवार, नरेंद्र येरावार, रमेश चिद्रावार, महेश वट्टमवार, डॉ.सुधिर गुंडेवार, सुरेश दमकोंडवार, गोविंद नलबलवार,आदीसह अनेक भाविक भक्त उपस्थित होते.
हिंगोली येथेही स्वागत - परमपूज्य अनंत महाराज बेलगावकर यांच्या नर्मदा परिक्रमेला नांदेड येथून सुरुवात झाली असून सायंकाळी हिंगोली येथे परिक्रमा वासियांचे डाॅ. गोपाळ महाजन परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात आले.