कारला गाव दोन दिवसापासून अंधारात महावितरणच्या अधिकारी व ठेकदारांचे दुर्लक्ष -NNL

दोन वर्षापासून बसवलेला डि.पी. केबल अभावी बंद


हिमायतनगर|
कारला गावात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असुन, सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने दररोज रात्रीच्या वेळी विज अचानक गुल होत आहे. त्यामुळे नागरिक निर्मण होणारेय उकड्यासह डासांच्या त्रासाने हैराण झाले आहेत. येथील डि .पी. बसवून दोन वर्षे उलटली मात्र महावितरण कंपनी व संबंधित ठेकेदाराच्या वांद्यात गाव अंधारात आहे. 

तात्काळ केबल जोडून डि.पी. चालू केल्यास विज पुरवठा सुरळीत होते. परंतु महावितरण कंपनीच्या संबंधिताने याकडे दुर्लक्ष केले जात असंल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आटा तर दोन दिवसापासून रात्रभर गाव अंधारात असुन देखील महावितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांना याचा काहीही देणंघेणं नाही असे दिसत आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी महावितरण समोर अमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. 

हिमायतनगर तालुक्यातील कारला पी गावात गेल्या काही दिवसापासून विज पुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे गावातील विद्युत पुरवठा कमी दाबाने चालत आहे. कारला गावात दोन वर्षापासून महावितरण कंपनी कडे काम करणाऱ्या एका ठेकेदाराने नविन डि. पी. बसविला आहे. परंतु डि. पी. केवळ शोभेची वस्तू बनली असून. या डि. पी. ला केबल जोडला नसल्याने पुर्ण गाव अंधारात आहे. येथील कर्तव्यदक्ष लाईनमन वाघमारे यांनी देखील अनेक वेळा गावातील हा प्रकार वरिष्ठांच्या काणी टाकला आहे. परंतु लाईनमन यांच्या मागणीकडे सदरील ठेकेदार व महावितरणचे अभियंता लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. 

याबाबत महावितरणचे उप कार्यकारी अभियंता लोणे यांच्याशी विचारणा केली असता केबल मिळत नसल्याचे सांगून जबाबदारी झटकत आहेत. त्यामुळे महावितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे गावातील विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही. परिणामी दि. 14 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिनी रात्रभर गाव अंधारात होते. विद्युत पुरवठा सुरळीत नसल्याने नागरीकासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. महावितरण कंपनी व सदरील गुतेदाराच्या वांद्यात गावकऱ्यांना उन्हाळ्याच्या दिवसात रात्र अंधारात काढावी लागत असुन, याकडे महावितरण कंपनीच्या वरिष्ठांनी लक्ष देऊन तात्काळ नवीन डि. पी. चा केबल जोडून द्यावा. याबरोबरच अन्य काही ठिकाणी असलेल्या विद्युत तारेची दुरूस्ती करावी अशी मागणी कारला ग्रामस्थांनी केली आहे. 

नविन डि. पी. चे केबल जोडल्यास गावात विज सुरळीत राहिल परंतु त्या  डि. पी. कनेक्शन अनेकदा सांगून देखील जोडण्यात येत नाही दि. 20 एप्रिल पर्यंत केबल जोडून विद्युत पुरवठा सुरळीत नाही झाल्यास संबंधित ठेकेदार व महावितरण च्या विरोधात मूख्य कार्यालयासमोर ग्रामस्थांना घेऊन अमरण उपोषण करण्याचा इशारा सरपंच गजानन पाटील कदम, तंटामुक्तीचे अध्यक्ष डॉ गफार, व ग्रामपंचायत च्या वतीने देण्यात आला आहे. 

उपअभियंता लोणे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले कि, गावातील सिंगल फेजवर लोड आल्याने विद्युत पुरवठा त्रिफेसला जोडण्यात आला आहे. सदरील ठेकेदार दोन केबल दिल्यानंतर नवीन डि. पी. सुरू होईल आणि लाईनमन काम करीत असल्याची माहिती उपअभियंता लोणे यांनी दिली आहे. 

 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी