नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, ललित व प्रयोगजीवी कला संकुलातील नाट्यशास्त्र विभागातर्फे प्रथमच राज्यस्तरीय भव्य एकपात्री अभिनय स्पर्धा दि. 26 एप्रिल 2022 रोजी आयोजित करण्यात आली आहे.
ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. या स्पर्धेत 18 ते 25 वयोगटातील युवक आणि युवती भाग घेऊ शकतील. या स्पर्धेत प्रथम क्रमांकास बक्षिस रोख रुपये अकरा हजार, द्वितीय क्रमांकास रोख रुपये सात हजार, तृतीय क्रमांकास रोख रुपये तीन हजार व उत्तेजनार्थ पाच बक्षिसे प्रत्यकी हजार रुपयांचे ठेवण्यात आली आहेत. प्रथम तीन क्रमांकाच्या बक्षिसांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र दिले जातील. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
या स्पर्धचे नियम आणि अटी पुढीप्रमाणे: 1) शासन, न्यायव्यवस्था, यावर गैरप्रकारचे भाष्य स्वगतामध्ये आढळल्यास त्या स्पर्धकास बाद केले जाईल .2) कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही याची स्पर्धकाने काळजी घ्यावी. 3) स्वगत स्वलिखित चालेल. 4) कोणत्याही नाटकातील स्वगत/ उतारा चालेल. या संबंधीची सविस्तर माहिती फॉर्ममध्ये भरावी.5) भूमिकेनुरूपच साजेशी वेशभूषा व रंगभूषा असावी. 6) भूमिकेस आवश्यक hand property वापरण्यास हरकत नाही.
7) स्वगत सादरीकरण करताना संगीताचा वापर करता येईल. (या संदर्भात स्पर्धकाने स्वतः व्यवस्था करावी). 8) भाषा, शब्दोच्चार - आंगिक- वाचिक- सात्त्विक अभिनयावर मूल्यांकन करण्यात येईल. 9) स्वगत सादर करण्यासाठी लागणारे साहित्य स्पर्धकाने स्वतः आणावे. 10) स्पर्धेसाठी येण्या-जाण्याचा खर्च स्वतः स्पर्धकाने करावा. प्रत्येक स्पर्धकाला 3 ते 5 मिनिटांचा वेळ दिला जाईल . 11) आयोजकांकडून खालील व्यवस्था करण्यात येईल .1) मंच 2) माईक 12) ऑनलाईन नावनोंदणी चा अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 एप्रिल .
परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील. या स्पर्धेत जास्तजास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन ललित व प्रयोगजीवी संकुलाचे संचालक डॉ. पी. विठ्ठल व स्पर्धेच्या समन्वयक डॉ. अनुराधा जोशी - पत्की यांनी केले आहे. संपर्कासाठी नंबर 7057344411/ 7385973056/ 8657789377/ 8805445966 स्पर्धेचे ठिकाण- ललित व प्रयोगजीवी कला संकुल , स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, वेळ - 9a.m. पासून नोंदणी करणे अनिवार्य आहे
खलील लिंक चा वापर करून त्वरित नोंदणी करावी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdUj_-XaXBXvZ7PuPd50KtzRYao7Z84uKnAEubI2L5rDPTFzg/viewform?usp=sf_link
रजिस्ट्रेशन नंबर नुसार परफॉर्मस होणार आहे.