नांदेड| दिपकनगर येथील श्रीनिकेतन प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका तथा संस्थेच्या सहसचिव डॉ.सौ.एस. एन. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली महामानव,भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक यशवंत थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात सर्वप्रथम भारतरत्न, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा पुरस्कार करणारे आहेत. त्यांनी समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले.
त्यांनी समाजातील अज्ञान, दारिद्र्य,जातिभेद दूर करण्यासाठी शिक्षणाला महत्त्व देऊन,शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा असा मोलाचा सल्ला त्यांनी दिल्यामुळेच आज शिक्षणाचा टक्का सर्व समाजात वाढल्याचे पहायला मिळते तेव्हा शिक्षकानी विद्यार्थ्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार रुजवणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन अध्यक्षीय समारोप करताना डॉ.सो. राऊत यांनी केल्या.
कार्यक्रमात मुख्याध्यापक यशवंत थोरात, श्रीमती सोनवणे, जगधने,सोनकांबळे,मोरताडकर मरशिवणे,प्रल्हाद आयनेले,श्रीधर पवार, अविनाश इंगोले, राठोड, कल्याणकर, मगरे, विद्यार्थीनी कु. निहारिका वाठोरे,शरयू कल्याणकर, पृथ्वीराज सूर्यवंशी आदींनी डॉ.बाबासाहेब आबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.. कार्यक्रमानंतर शाळेच्या प्रांगणात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्याध्यापिका डॉ.सौ. राऊत यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्र संचलन आयनेले यांनी तर उपस्थितांचे आभार कल्याणकर यांनी मानले. कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.