एसटी डेपो नांदेड आगार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी -NNL


नांदेड|
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड आगार येथे दि. १४ एप्रिल २०२२ गुरुवार रोजी सकाळी ठिक १० वाजता ज्ञानसूर्य, विश्‍वरत्न, भारतरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती सर्व नांदेड आगार कर्मचार्‍यांच्यावतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 

यावेळी आगार व्यवस्थापक पुरुषोत्तम ता. व्यवहारे, चार्जमन श्रीनिवास रेणके, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड, वरिष्ठ लिपीक राजेश गहीरवार, वाहतुक निरीक्षक सलीम शेख, सामाजिक कार्यकर्ते बाबादास पाटोदेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

सर्वप्रथम आगार व्यवस्थापक पुरुषोत्तम व्यवहारे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून गुणवंत एच. मिसलवाड यांनी आपले विचार मांडले. ते आपल्या भाषणात म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रम घेऊन भारतीय राज्यघटना लिहून भारत देश एकसंघ ठेवण्याचे खूप मोठे कार्य केले असून त्यांचे या आपल्या भारत देशाप्रती फार मोठे योगदान असून आपण सर्वांनीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा व विचारांचा आदर्श घेऊन त्यांचे विचार आणि कार्य तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून आपण सर्वांनीच कार्य करण्याची काळाची गरज आहे, असे प्रतिपादन केले.

यावेळी आगार कर्मचारी माधवराव पवार, बालाजी घोडके, भारत राऊतखेडे, सौ. लक्ष्मी पाटोदेकर, सौ. कल्पना गाडे, सौ. श्‍वेता तेलेवार, मीना कदम, सौ. प्राजक्ता भालेराव, अजय मच्चल, संदीप देशमुख, प्रसाद गोंदगे, श्रीमती मनकर्णा आबादार, संतोष स्वामी, विनोद हातागळे, अविनाश भागवत, संदीप भरांडे, गंगाधर कोकरे, शेख महमद अफजल, लक्ष्मण शिरकंठे, बशीरखान, बाबुराव तरपेवाड, आनंद कदम कोंढेकर, विजय खेडवनकर हे कर्मचारी बंधु-भगिणी उपस्थित होते. शेवटी विठ्ठल इंगळे यांनी सर्वांचे आभार मानले. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी