नांदेड। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथील माध्यम शास्त्र संकुलातील विद्यार्थ्यानी तयार केलेले लघुपट , माहितीपट , आदी निर्मिती चा प्रसार - प्रचार व्हावा विद्यार्थ्याच्या कला गुणांना वाव मिळावा या हेतूने संकुलातर्फे मिडीयन या नावाने एक यु ट्यूब चैनल ची निर्मिती करण्यात आली त्याचे उदघाटन आज संचालक डॉ. दीपक शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले .
अभ्यासक्रमाचा एक भाग आणि प्रात्यक्षिक कार्य म्हणून संकुलातील विद्यार्थ्याकडून विविध प्रकारची व्हिडियो निर्मिती स्वीकारली जाते यात लघुपट , माहितीपट, चित्रपट समीक्षा , आदींचा समावेश होतो .
हि संपूर्ण निर्मिती प्रक्रिया ज्यात पटकथा लेखन , चित्रीकरण , संपादन या सर्व बाबी संकुलातील विद्यार्थ्या कडून संचालक डॉ. दीपक शिंदे, डॉ. सचिन नरंगले आणि डॉ . कैलाश भानुदास यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केली जाते.
या सर्व निर्मितीना एक योग्य व्यासपीठ मिळावे या उद्देशाने यु ट्यूब चैनल "मिडीयन"ची निर्मिती करण्यात आली आहे. आणि आपण हि गुणवत्तापूर्ण निर्मिती करून या चैनल वर जागा निर्माण करावी असे प्रतिपादन डॉ . शिंदे यांनी यावेळी केली . उदघाट्न नंतर प्रवेशित विध्यार्थ्यांना माजी विध्यार्थ्यांनि तयार केलेले लघुपट दाखविण्यात आले आणि त्याच्यावर चर्चा करण्यात आली याप्रसंगी प्रा. रोहन तायडे , प्रा. गिरीश जोंधळे , प्रेम लोणेकर , प्रज्ञाकिरण जमदाडे आणि मोठ्या प्रमाणावर विधार्थी उपस्थित होते.