नांदेड। श्रीराम नवमी निमित्त विश्व हिंदू परिषद बजरंग दल तर्फे 10 एप्रिल 2022 रविवार रोजी सकाळी 8:30 वाजता भव्य मोटर सायकल रॅली चे आयोजन करण्यात आलेले आहे.
या मोटर सायकल रॅलीचा मार्ग पंचवटी हनुमान मंदिर ते मुथा चौक ते शिवतीर्थ ते चिखलवाडी ते अण्णाभाऊ साठे चौक ते नाईक चौक ते आनंद नगर,भाग्यनगर ते अशोक नगर राम मंदिर असा असणार आहे. ह्या भव्य मोटर सायकल रॅली ची तयारी उत्साहात चालू आहे. तरुण वर्गाकडून सुद्धा या भव्य मोटरसायकल रॅलीस चांगला प्रतिसाद मिळत आहे.
ह्या रॅलीच्या प्रचारासाठी आत्तापर्यंत ऍटोचे बॅनर, गाडीचे स्टिकर प्रत्येक गाडीवर, ऑटोवर व मंदिरावर लावून जोऱ्यात प्रचार करण्यात आलेला आहे. रॅलीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक गाडीवर ओम प्रतिक असलेला भगवा झेंडा राहणार आहे. ह्या रॅलीमध्ये महिलांचा सुद्धा समावेश राहणार आहे. हि रॅली पोलीस प्रशासनाच्या सर्व नियमा अंतर्गत राहूनच निघणार आहे व शिस्तीत निघणार आहे.
तरीही सर्व राम भक्तास सूचना करण्यात येते की आपले ड्रायव्हिंग लायसन्स आपल्या जवळ ठेवणे, सायलेन्सर काढू नये, नंबर प्लेट काढू नये, फक्त जय श्रीराम नावाच्या घोषणा राहाव्यात. तरीही विश्व हिंदू परिषद बजरंग दल तर्फे आवाहन करण्यात येते की जास्तीत जास्त संख्येने ह्या भव्य मोटर सायकल रॅली मध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा.
.jpeg)