खा.शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा केला निषेध
नांदेड| राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा माजी कृषी मंत्री खा.शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक निवासस्थानी भाजपा प्रणित एस.टी.कर्मचारी संघटनेनी विकृत लोकांनी चेतावणी देत हल्ला केला. या हल्ल्याच्या निषेधार्थ नांदेड जिल्हा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने शहर जिल्हा अध्यक्ष डॉ.सुनिल कदम यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली नांदेड शहरातील महात्मा गांधी पुतळ्या जवळ राष्ट्रवादी काँग्रेस शहरच्यावतीने मुक आंदोलन करून या हल्ल्याचा जाहिर निषेध दि.9 एप्रिल रोजी करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हा अध्यक्ष डॉ.सुनिल कदम, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश अध्यक्ष अॅड.मोहम्मद खान पठाण, माजी विरोधीपक्ष नेता जिवन पाटील घोगरे, कल्पनाताई डोंगळीकर, जर्नेलसिंघ गाडीवाले, सिंधूताई देशमुख, युवकचे शहर अध्यक्ष रऊफ जमीनदार, विद्यार्थीचे शहर अध्यक्ष कन्हैया कदम, तातेराव पाटील आलेगावकर, गजानन वाघ, कमलबाई लांडगे, गणेश तादलापूरकर, प्रेमजितकौर कोल्हापुरे, श्रीधर नागापुरकर, एकनाथ वाघमारे, लक्ष्मण भवरे, मोहम्मदी पटेल, शहिदा पटेल, अॅड.प्रियंका कैवारे, भिमराव क्षिरसागर,
पाशाखान तांबोळी, रहेमतअली खान, राहूल जाधव, प्रकाश मोराळकर, मो.खालेद नवाज, स.मनबिरसिंघ ग्रंथी, प्रसाद पवार, मोहम्मद सईमान, मोहम्मद शोएब, अनिकेत भंडारे, युनूसा खॉन, शफी उर रहेमान, माधव चिंचाळे पाटील, हिदामत खान तामसेकर, प्रविण घुले, कृष्णा पुयड, खदीर भाई कुरेशी, मारोती चिवळीकर, सुमेध सरपाते, बालाजी बोकारे, मकसुद पटेल, सय्यद ईलियास राजूरकर, जिलानी पटेल, आकाश ठाकूर, गोविंद यादव यांच्यासह आदी जणांची यावेळी उपस्थिती होती.
दोषींवर कारवाई करा -डॉ.सुनिल कदम - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी शांतता व अहिंसेच्या माध्यमातून जहाल राजवटीचा नायनाट केला त्याच प्रमाणे चेतावणी देवून अशा प्रकार विकृत लोकांनी 5 महिन्या पासून शांततेत चाललेले एसटी कर्मचार्यांच्या आंदोलनाची दिशा हिंसक वळणावर नेवून महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच पोहोचवली आहे. ज्यामुळे पुरोगामी महाराष्ट्राची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न भाजपा प्रणित एसटी महामंडळाच्या कर्मचार्यांनी केला आहे. अशा लोकांवर वेळीच कारवाई करावी जेणेकरून अशा घटना घडणार नाहीत. असे मत नांदेड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँगे्रस पार्टीचे अध्यक्ष डॉ.सुनिल कदम यांनी व्यक्त केले.