शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,रा.युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, रा. युवा जिल्हाध्यक्ष धनंजय सुर्यवंशी यांच्या संकल्पनेतून मुखेड तालुका अध्यक्ष शिवाजी पा.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्याध्यक्ष संभाजी पा.मुकनर यांच्या नेतृत्वाखाली सिल्व्हर ओक बंगल्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निदर्शने करत निषेध व्यक्त करण्यात आला त्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी मुखेडचे तहसिलदार काशिनाथ पाटील यांच्या मार्फत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणीचे निवेदन राज्य सरकारला देण्यात आले.
यावेळी सुनील मुक्कावार,शादुल होनवडजकर , कपिल कांबळे , अमोल वाकोडे,जयभीम सोनकांबळे, लक्ष्मण सोमवारे, रमाकांत पा.जाहुरकर , दिनेश पा.गायकवाड , सचिन देवकत्ते , अशोक बच्चेवार, कैलास मादरसवाड, आनंदा शिंपाळे ,मगदूम पठाण यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा, आमचे नेते, आदरणीय खा.शरदचंद्र पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर माथेफिरू आंदोलकांनी दगडफेक केली आहे. त्यांचा आम्ही तिव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहोत. सरकारने माथेफिरूना तात्काळ अटक करून व सिल्व्हर ओक बंगल्याला कडेकोट सुरक्षा व्यवस्था करावी अशी प्रतिक्रिया संभाजी पा.मुकनर राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष नांदेड यांनी दिली.