अर्धापूर| बाल विकास नागरी प्रकल्प कार्यालय ३ च्या वतीने पोषण आहार पंधरवाडा कार्यक्रम बाल विकास प्रकल्प अधिकारी मिलिंद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला.
बाल विकास नागरी प्रकल्प यांच्या वतीने पोषण आहार पंधरवाडा कार्यक्रमांतर्गत जलसंवर्धन विषयी महिलांची भूमिका, बालकांना पारंपरिक आहाराचे महत्व याबद्दल माहिती तसेच अनेमिया प्रतिबंध व उपचार घ्यायची काळजी. या विषयी जनजागरण करून तसेच गरोदर माता ९९, तस्नदा माता ५४, किशोरीमुली १०५, अंगणवाडी सेविका व मदतनीस १६० यांची आरोग्य तपासणी रक्तगट तपासणी यासह विविध कार्यक्रम करून व जन जागरण पोषण पंधरवडा साजरा करण्यात आला.
यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी मिलिंद वाघमारे यांनी उपस्थित अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रवेक्षीका वैशाली मेघमाळे, सुषमा शिसोदे, मंदाकिनी जोशी व तपासणी आरोग्य अधिकारी डॉ बाबासाहेब पवार, सिंधू वासमवार,मो.जमालुद्दिन, एस.के.वसीमोडीन,प्रीतम धुळे, प्रज्ञा कदम,भाग्यश्री शिंदे आदींनी सहकार्य केले आहे.