डॉ. शिवराज बोकडे यांच्या विद्यापीठामधील कार्यकाळात राष्ट्रीय सेवा योजनेतून अनेक विद्यार्थी घडले -कुलगुरू डॉ. उद्धव भोसले -NNL


नांदेड|
डॉ. शिवराज बोकडे हे एक प्रामाणिक प्राध्यापक आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या संचालक पदाला त्यांनी योग्य न्याय दिला आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आदर्श व्यक्ती घडविण्यासाठी त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले. 

आणि त्यातून अनेक विद्यार्थी घडविले, असे मत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी व्यक्त केले. ते दि. ३१ मार्च रोजी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. शिवराज बोकडे आणि विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. ज्ञानोबा मुंडे यांच्या कार्यकाळ पूर्ण झाल्या निमित्त त्यांच्या सेवा मुक्तीच्या कार्यक्रमात बोलत होते. 

यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी डॉ. शिवराज बोकडे आणि डॉ. ज्ञानोबा मुंडे या दोघांचेही शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. याप्रसंगी व्यासपीठावर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे यांची उपस्थिती होती.  

पुढे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले म्हणाले की, कोव्हीड-१९ महामारीमध्ये डॉ. बोकडे यांनी स्वतःच्या जीवाची तमा न बाळगता समाजासाठी कार्य केले. या दरम्यान त्यांनी विद्यापीठाचे एक वाहन घेऊन शहरभर फिरले. त्यामधून अनेक पोलिस, डॉक्‍टर आणि सेवा पुरविणाऱ्यांना सॅनिटायझर केले. विद्यापीठांमधील ‘हरित विद्यापीठ’ आणि ‘स्वच्छ विद्यापीठ’ मोहिमेमध्ये त्यांनी यशस्वीरित्या काम केले आहे. 

डॉ. बोकडे यांच्याबरोबरच विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. ज्ञानोबा मुंडे यांचाही कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे त्यांनाही सेवा मुक्तीच्या या कार्यक्रमांमध्ये निरोप देण्यात आला. त्यांच्या बाबतीत कुलगुरू डॉ. उद्धव भोसले म्हणाले की, डॉ. मुंडे यांच्या काळात त्यांनी यशस्वीरित्या युवक महोत्सवाचे आयोजन केले होते. ‘आजादी का अमृत महोत्सव’ या कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजनामध्ये त्यांची महत्वाची भूमिका होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. वैजनाथ अमूलवाड यांनी म्हाणले. या कार्यक्रमास विद्यापीठातील शिक्षक शिक्षकेतर अधिकारी व कर्मचारी मोठ्यासंखेने उपस्थित होते. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी