मोठ्या माणसांनी खोटी प्रसिद्धी लाटू नये ; प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या तृतीयपंथीयांच्या -NNL

नांदेड पॅटर्न ची वास्तविकता व दाहकता अंगावर शहारे आणणारी - कॉ. गंगाधर गायकवाड


नांदेड|
काही ठिकाणी काही मानव समाजातून बहिष्कृत असलेल्या तृतीयपंथीयांसाठी लढा उभारून त्यांच्या न्यायहक्का साठी आंदोलन उभे करून योग्य बदल घडऊ पाहणाऱ्या कॉ. गंगाधर गायकवाड यांनी आज नांदेड येथील माकपच्या कार्यालयाकडून प्रतिक्रियात्मक माहिती दिली आहे.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नांदेड शहर कमिटीचा व तृतीयपंथीयांचा फार जवळून संघर्षमय संबंध आलेला आहे. तृतीय पंथीयांचे जीवन माकपच्या कार्यकर्त्यांनी अगदी जवळून पाहिले असून किन्नर तथा हिजडा जन्माला आल्यास सर्वप्रथम त्यास आई-वडील नाकारतात, अर्थातच बहिष्कार टाकतात हे आम्ही तृतीयपंथीयांच्या तोंडून ऐकले आहे. तृतीयपंथी म्हणून जन्मास आल्यानंतर समाजात अनपेक्षित विविध गोष्टींचा त्यांना सामना करावा लागतो. त्यांच्या मधे देखील (अर्थातच) तृतीयपंथीयामध्ये वेगवेगळे समूह असतात व समूहाच्या प्रमुखाला गुरु म्हणून संबोधले जाते. असेच एक गुरू आमच्या संपर्कात आले होते. त्यांचे नाव आहे गुरु गौरी बकश उर्फ गौरी अहमद नायक, त्यांचे वास्तव्य नांदेड शहरात असून ते हजरजबाबी, प्रेमळ,मनमिळावू आणि अंगी धाडसीबाणा असलेले व्यक्तिमत्व आहेत.

त्यांचे असंख्य  शिष्य मराठवाड्यासह राज्यात व परराज्यात देखील आहेत.  लोकडॉऊन काळामध्ये सर्वच तृतीयपंथी अत्यंत अडचणीत आले होते,काही प्रमाणात लॉक डाऊन शीथील  झाल्यानंतर ते मदत मागण्यासाठी रस्त्यावर येऊ लागले आणि बाजारात आल्यानंतर त्यांना काही ठिकाणी पोलिसांकडून त्रास देखील झाला आहे. तेव्हा नांदेड शहरातील एका पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना आम्ही कायद्याचा हवाला देऊन त्यांना सोडविण्यासाठी मदतही केली आहे. त्यानंतर तृतीयपंथीयांच्या एका मोठ्या गटासोबत आमचे उठणे बसणे सुरू झाले. तुम्ही एवढे मोर्चे लोकांसाठी काढता आमच्यासाठी देखील काहीतरी करावे अशी भावनिक हाक आम्हाला तृतीय पंथीयांच्या एका समुहाच्या वतीने देण्यात आली.

 आम्ही विचार करून निर्णय घेऊ असे त्यांना सांगितले व पक्षाच्या वरिष्ठ कॉम्रेड्स सोबत चर्चा करून ट्रांसजेंडर  महाविकास जनआंदोलन (लालबावटा) ची स्थापना करून प्रस्तावित स्वरूपात एक समिती स्थापन करून प्रत्यक्ष कामास सुरूवात केली. तृतीयपंथीयांच्या जीवनमानात सुधारणा आणण्याच्या उद्देशाने माकप प्रणीत ट्रांसजेंडर महाविकास जनआंदोलन लाल बावटा या नावाने समिती स्थापन केली आणि समितच्या वतीने दिनांक 15 मार्च 2021 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे यांना निवेदन देऊन ट्रान्सजेंडर पर्सन प्रोटेक्शन ऑफ राईट बिल 2019 ची अंमलबजावणी करून ट्रांसजेंडर यांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रावधान करण्यात आले आहे. त्याप्रमाणे  योग्य  कारवाई करण्याची मागणी केली होती. 

देशात तृतीयपंथीयांची संख्या पन्नास लाख असून ट्रान्सजेंडर समूहातील सदस्यांना सामाजिक बहिष्कारासह, शैक्षणिक सुविधांच्या कमी, बेरोजगारी ,आरोग्य सुविधांचा अभाव ,अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो ही वस्तुस्थिती आम्ही राज्य व केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिली होती. नांदेड शहरातील तृतीय  पंथीयांच्या खालील मागण्या आम्ही आमच्या लाल बावटा  फोरमच्या वतीने लेखी स्वरूपात शासन कर्त्या वरिष्ठांकडे  केल्या आहेत.

त्यामध्ये नांदेड महानगरपालिकेच्या हद्दीतील तृतीय पंथीयांच्या समशानभूमी साठी पाच एकर जमीन देण्यात यावी. त्यांना घरकुल मंजूर करून घराचा ताबा देण्यात यावा. मदत मागण्यावर बंदी घालण्यात येऊ नये. ट्रान्सजेंडर लिंगाच्या कोषटका प्रमाणे आधार कार्ड, रेशन कार्ड देण्यात यावे तृतीयपंथी हे विस्थापित असल्यामुळे त्यांचा 50 लाख रुपयांचा विमा शासनाने काढावा. त्यांना व्यवसायासाठी बिनव्याजी दहा लाख रुपये कर्ज देण्यात यावे. तृतीय पंथीयांना शासनाने गो शाळा सुरू करून द्यावी व प्रती गो शाळेस शासनाने 100 गोमाता अनुदान स्वरूपात देण्यात याव्यात. बचत गट स्थापनेसाठी मान्यता द्यावी व शासकीय कक्षाची अंमलबजावणी करावी. शासनातर्फे बँक खाते काढून देण्यात यावे. समशान भूमी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी व्यवस्था करावी.

आदी महत्त्वपूर्ण मागण्या माकप प्रणीत महा विकास जनआंदोलनाच्या वतीने केंद्र व राज्य सरकारकडे करण्यात आल्या होत्या. उपरोक्त निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी नांदेड, पोलीस अधिक्षक नांदेड, आयुक्त नांवाशमनपा नांदेड, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग  नांदेड यांच्यासह इतरही संबंधित अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या होत्या. लाल बावटा जनआंदोलनाच्या वतीने पहिले निवेदन दिनांक 15 मार्च 2021 रोजी शासनास देऊन जिल्हाधिकारी नांदेड यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याची नोटीस देण्यात आली होती.

दुसरे पत्र दिनांक 24 मार्च 2021 रोजी मनपा आयुक्त नांदेड व जिल्हाधिकारी नांदेड यांना देण्यात आले होते व नंतर दिनांक 25 मार्च 2021 रोजी लालबावटा जनआंदोलन व जिल्हाधिकारी नांदेड यांची जिल्हाधिकारी कार्यालयात  संयुक्त बैठक सकारात्मक झाली.

तिसरे पत्र दिनांक 5 एप्रिल 2021 रोजी जिल्हा प्रशासनास देण्यात आले असून मनपाचे सहाय्यक आयुक्त सामान्य प्रशासन विभाग यांनी जनआंदोलनाचे अध्यक्ष कॉम्रेड गंगाधर गायकवाड यांना पत्र देऊन योग्य कारवाई करीत असल्याचे कळविले होते. नंतर दिनांक 11 मे 2021 रोजी जिल्हाधिकारी यांचे कक्षात दुसरी बैठक झाली व दिनांक 26 मे 2021 रोजी तिसरे पत्र देऊन कारवाई करण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानंतर दिनांक 2 जून 2021  रोजी आणखी एक बैठक जिल्हा प्रशासनाने आयोजित केली होती परंतु आम्ही केलेल्या मागण्यांची दखल प्रशासनाने घेतली नसल्यामुळे दिनांक 16 जून 2021 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन नांदेड येथील सहाय्यक समाज कल्याण आयुक्त यांच्या कार्यालयासमोर माकप प्रणित महाविकास जनआंदोलन लाल बावटा च्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

केंद्र आणि राज्य सरकारकडे सतत पाठपुरावा केल्यामुळे तृतीयपंथीयांच्या  मागण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्हा प्रशासनाच्या वतीने काही कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना लालबावटा परवडणारा वाटत नसल्याने त्यांनी काही अराजकीय संघटनांच्या प्रतिनिधींना हाताशी धरून आपण संयुक्तपणे सर्व प्रश्न सोडवित आहोत असे चित्र निर्माण केले. एकंदरीतच माकप प्रणित लाल बावटा जनआंदोलनाच्या वतीने विविध आंदोलने व अनेक निवेदने देऊन शासनाचे लक्ष वेधले आहे व तृतीय पंथीयांचे प्रश्न सोडविण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले आहेत. सुरुवातीच्या काळात आम्ही निवेदन देण्यासाठी गेल्यानंतर काही कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी  आम्हाला हसत होते परंतु आज तृतीयपंथीयांच्या  काही  मागण्या पूर्ण होत असताना तृतीय पंथीयांचे भले आम्हीच कसे केले असे दाखवून मोठ्या माणसांकडून  श्रेय लाटण्याचा खोटा प्रयत्न केला जात आहे.

तृतीयपंथीयांचे प्रश्न सोडविण्यासाठी माकपच्या वतीने नांदेड शहर सचिव कॉम्रेड गंगाधर गायकवाड, कॉ.मारुती केंद्रे ,कॉ.मगदूम पाशा यांनी पूर्णवेळ काम केले असून कॉ.विजय गाभणे,कॉ.उज्वला पडलवार यांनी वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य केले आहे.  सरकारच्या वतीने नांदेड शहरामध्ये तृतीय पंथीयांना घेऊन डॉक्यूमेंट्री, बायोग्राफी,फोटो शॉपी, नांदेड पॅटर्न, ह्या सर्व गोष्टी घडत आहेत परंतु या सर्व गोष्टीमुळे तृतीयपंथीयांचे पोट भरत नसते तर त्यासाठी लोकसभेमध्ये पारित झालेल्या सन 2019 च्या बिला ची ठोसपणे अंमलबजावणी करून तृतीयपंथीयांना न्याय हक्क देऊन रोजगार निर्माण करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची खरी गरज आहे.  

अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने राज्य व केंद्र  सरकारकडे पुन्हा पुन्हा करण्यात येणार असून त्यांचे जीवन मरणाचे प्रश्न सोडविण्यासाठी लढा आणखीही तीव्र करणार असल्याची माहिती कॉ.गंगाधर गायकवाड यांनी माकपच्या कार्यालयाकडून दिली आहे. जिल्ह्यातील व शहरातील सर्व तृतीयपंथीयांना जोपर्यंत योग्य न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच असेल असा मानस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष नांदेड शहर कमिटीचा आहे.

- लेखक हे मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नांदेड शहर सचिव असून " द हिंदू " राष्ट्रीय  इंग्रजी वृत्तपत्राचे चांगला प्रेस मिळविलेले नोंदीत कार्यकर्ते आहेत.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी