राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीचा प्रश्न सोडवण्याकरिता पैनगंगा अभयारण्य पर्यावरण संवेदनशील क्षेत्राची -NNL

सनियंत्रण समितीची बैठक पुन्हा बोलवा - माजी आमदार प्रदीप नाईक 


किनवट, माधव सुर्यवंशी|
नांदेड - भोकर - हिमायतनगर - किनवट माहूर या राष्ट्रीय महामार्ग क्रं १६१ ए जो की किनवट शहरातून जात आहे पैनगंगा अभयारण्य पर्यावरण संवेदनशील क्षेत्राची सबब पुढे करत जिजामाता चौक ते अशोक स्तंभ या केवळ २०० मीटर लांबीच्या मार्गाचे काम इको सेन्सेटिव्ह झोन मध्ये येतो ? या संदर्भात महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी यवतमाळ जिल्हाधिकारी यांच्या दालनात ११ डिसेंबर २०२० रोजी घेण्यात आलेल्या बैठकीवरच किनवटचे माजी आमदार प्रदीप नाईक यांनी संशय व्यक्त केला आहे. 

कारण या बैठकीत किनवट संघर्ष समिती नावाने समिती स्थापन करून त्या समितीने ठराव मांडला की किनवट शहरात अशोक स्तंभ ते जिजामाता चौक पर्यंत 200 मीटर लांबीचा रस्ता 18 मीटर रुंद करण्यात यावा असा प्रस्ताव त्यावेळी मान्य करण्यात आल्याने आज रस्ता अरुंद निर्माण होत आहे, त्यामुळे पर्यावरण संवेदनशील क्षेत्राची सनियांत्रान समितीची बैठक पुन्हा बोलवून झालेली चूक दुरुस्त करण्याच्या करिता माजी आमदार प्रदीप नाईक यांनी स्वतः तसे पत्र जिल्हाधिकारी यवतमाळ यांना गुरुवारी दिले आहे. 

कारण इको सेन्सिटिव्ह झोन चा किनवट शहराशी कोणताही संबंध नसताना व 30 मीटर रुंदी पेक्षा कमी रुंदीचा राष्ट्रीय महामार्ग होऊच शकत नाही असा शासनाचा नियम असताना किनवट शहरात सर्व नियमांना बगल देऊन काम केले जात असल्याने व शहरातून जाणाऱ्या या महामार्गाच्या रुंदीमध्ये छेडछाड करून अन्याय केल्याची भावना माजी आमदार प्रदीप नाईक यांनी व्यक्त केली आहे.

राष्ट्रीय महामार्ग अधिकारी व कुणालाही माहीत नसलेल्या किनवट संघर्ष समितीने चुकीचे सादरीकरण करून प्रशासनाची दिशाभूल केली आहे शहरातील व तालुक्यातील नागरिकांना विश्वासात न घेता समिती कशी गठीत केली ? बोगस समितीवर माजी आमदार नाईकांनी शंका व्यक्त केली आहे. अशा बोगस समित्या स्थापन करून शहराची किती वाट लावली आहे खरेतर याची उच्चस्तरीय चौकशी होणे आवश्यक असल्याचे नाईक म्हणाले ज्यांचे बांधकाम महामार्गावर आहे तेच किनवट संघर्ष समितीचे अध्यक्ष कसे असा प्रश्नही माजी आमदार नाईक यांनी उपस्थित केला.

शहरातून जाणारा हा मार्ग आयेप्पा स्वामी मंदिर ते डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ३० मीटर रुंदीचा होणार आहे मग जिजामाता चौक ते अशोक स्तंभ हा २०० मीटर लांबीचा मार्ग चुकीच्या सादरीकरणामुळे १८ मीटर रुंदीचा बनवण्याचा घाट घातला जात आहे. तर १८ मीटर रुंद रस्ता ठेवण्यात आल्यास रेल्वे उड्डाणपूल बनवता येणार नाही असे माजी आमदार प्रदीप नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. ३० मीटरपेक्षा कमी रुंदीचा रस्ता केला तर रेल्वे उड्डाणपूल बनवता येत नाही. त्यामुळे किनवटच्या विकासात बाधा आणण्याचे काम केले जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

पैनगंगा अभयारण्यामुळे इको सेन्सेटिव्ह झोन पुढे करून शहरातुन जाणाऱ्या महामार्गाची रुंदी कमी करून विकास खुंतवण्याचा प्रकार केला जात आहे. किनवट हा मराठवाड्यातील आदिवासी, बंजारा बहुल मागास तालुका आहे भौगोलिक दृष्ट्या राज्यातील दळणवळणाकरिता अत्यंत महत्त्वाच्या अशा नागपूर ते तुळजापूर व सारखणी ते चंद्रपूर, भागलपूर, नागपूर ते हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गाना एकमेकांना जोडणारा सर्वात कमी अंतरावरील महत्वाचा केंद्रबिंदू असल्याने गोकुंदा  येथील रेल्वे  उड्डाणपूल अत्यंत महत्त्वाचा असल्याचेही नाईक यांनी म्हटले आहे.

या मार्गावरील अतिक्रमण धारकांच्या निवेदनावर मंजूर केलेल्या ठरावा संदर्भात पुन्हा योग्य पध्दतीने यवतमाळ जिल्हाधिकारी यांच्या दालनात बैठक बोलावण्यात यावी अशी मागणी निवेदनात माजी आमदार प्रदीप नाईक यांनी केली आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे (भा. प्र.से) हे पर्यावरण संवेदनशील क्षेत्राच्या सनियांत्रण समितीचे अध्यक्ष ही आहेत त्यांनी  निवेदन स्वीकारले आहे.  मिटिंग घेऊन प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी येडगे यांनी शिष्टमंडळाला दिले तर पुसद चे उपवसंरक्षक अशोक सोनकुसरे (भा. प्र. से) जे पर्यावरण संवेदनशील क्षेत्राच्या सनियांत्रन समितीचे सचिव देखील आहे.

त्यांनी ही या संदर्भात बैठक बोलावण्याकरिता  जिल्हाधिकारी यवतमाळ यांना पत्र व्यवहार केला आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष साजीद खान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ता. अध्यक्ष प्रकाश राठोड, शिवसेनेचे व्यंकटराव भंडारवार, कचरू जोशी, डॉ. रोहिदास जाधव यांची उपस्थिती होती

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी