राजेश्‍वर कांबळे मराठवाडास्तरीय ‘शोधवार्ता’ पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित -NNL


कंधार|
येथील पत्रकार राजेश्‍वर कांबळे यांना उदगीर तालुका पत्रकार संघाचा मराठवाडास्तरीय ‘शोधवार्ता’ पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम, पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते राजेश्‍वर कांबळे यांना रविवारी मराठवाडास्तरीय ‘शोधवार्ता’ पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दोन हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

उदगीर तालुका पत्रकार संघाचा मराठवाडास्तरीय पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि.१७ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता उदगीरातील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. पुरस्काराचे हे १३ वे वर्ष होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम, पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे, जेष्ठ पत्रकार अमर हबीब, माजी आमदार प्रा.मनोहर पटवारी, डाॅ.श्रीकात मध्वरे, लातूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, लातूर जिल्हा परिषदेचे सदस्य रामराव राठोड, अमेरिकेतील व्हाॅलिबाॅलपटू अतिख कादरी, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिध्देश्वर पाटील, जेष्ठ संपादक सुर्यप्रकाश धुत, उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनिएल बेन, पोलिस निरीक्षक दिपककुमार वाघमारे, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.आर.ताबोळी, लातूरचे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, परिक्षक प्रा.डाॅ.बी.आर. दहीफळे, जेष्ठ संपादिका निर्मलाताई भांगे, लक्ष्मी अर्बन को-आॅपरेटीव्ह बँक लि.लातूरचे सुशील जोशी, उदगीर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राम मोतीपवळे, सचिव दयानंद बिरादार, कार्याध्यक्ष अॅड.एल.पी.उगीले आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

या सोहळ्यात सर्वप्रथम पत्रकार राजेश्‍वर कांबळे यांना महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम, पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उदगीर तालुका पत्रकार संघाचा वर्ष २०२१ चा मराठवाडास्तरीय ‘शोधवार्ता’ पत्रकारिता तृतीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ‘कोरोना रुग्णांसाठी १०८ रुग्णवाहिका ठरतेय जीवनदायी’ या बातमीसाठी हा पुरस्कार जाहीर झाला होता. दोन हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. पत्रकार प्रशांत अपसिंगेकर यांच्या वतीने जेष्ठ पत्रकार कै.अनंत अपसिंगेकर यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार देण्यात आला आहे. पत्रकारिता क्षेत्रातील महत्वाचा आणि प्रतिष्ठेचा हा पुरस्कार समजला जातो.

राजेश्‍वर कांबळे हे निःपक्ष आणि निर्भीड पत्रकार आहेत. गेल्या आठरा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. विविध क्षेत्रांवर त्यांनी विपुल लिखाण केले आहे. त्यांनी अनेक वृत्तपत्रांमध्ये काम केले आहे. अनेक उच्च पदे त्यांनी यशस्वीपणे भूषवले आहेत. शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक उपक्रमांत त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. त्यांच्या जीवनावर आधारित अकरा लेख प्रकाशित झाली आहेत. यापूर्वी राजेश्‍वर कांबळे यांना अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. आता मराठवाडास्तरीय ‘शोधवार्ता’ पत्रकारिता पुरस्कारामुळे राजेश्‍वर कांबळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध स्तरांतून राजेश्‍वर कांबळेंचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी