लोहा| नगर पालिकेच्या प्रशासनावर कोणाची वचक राहिली नाही.. ..शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य दिव्य जयंती मिरवणूक निघाली या, मिरवणूक मार्गावरील रस्त्यांची सफाई..स्वच्छता.. मुख्य रस्त्याववरील दगड गोटे.उचलले नाहीत मिरवणूक काळात सावलीसाठी टेंट तसेच मिनरल पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली नाही. अशी नाराजी सार्वजनिक भीम जयंती मंडळ व आंबेडकरी जनतेनी व्यक्त केली.
लोहा शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचीजयंती मोठ्या धुमधडक्यात साजरी झाली. पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी मिरवणूक रस्त्यावर सगळे खड्डे व काही बांधकाम साहित्य दुकानदारांच्या वस्तू राहणार नाहीत याची काळजी घ्यावी व पाणी पुरवठा तसेच आरोग्य, अग्निशमन यांना आवश्यक ते उपाययोजना करण्याचे लेखी कळविले.होते तर प्रभारी असलेले सहायक पोलिस निरीक्षक शेख गफार यांनी रिमांड केले. तरीही जुना लोहा -मारुती मंदिर- ते क्रांतीसुर्य बुद्ध विहार या मार्गातील खड्डे, बांधकाम साहित्य तसेच कोणत्याही अडथळा करणाऱ्या वस्तू काढण्याची तत्परता दिसली नाही.
जयंती निमित्ताने रस्ते स्वच्छ चकाचक केले नाहीत . रस्त्यावरील खड्डे..आजूबाजूचे दगड गोटे.यांचा सहभागी जनतेला त्रास झाला. धूळ जावी म्हणून रस्त्यावर .. पाणी टाकायला पाहिजे होते . तसे झाले नाही. नगर पालिका प्रशासन आणि संबंधित विभाग यांनी कोणतीही व्यवस्था केली नव्हती.नगर पालिका सभागृहात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त नगराध्यक्ष यांनी अभिवादन केले पण मुख्याधिकारी त्यावेळी नव्हते कार्यालयीन अधीक्षक व कर्मचारी हजर होते.
वस्तुतः नगर पालिकेने शहरात होणाऱ्या शिव जयंती, भीम जयंती, अण्णा भाऊ साठे जयंती , महात्मा बसवेश्वर जयंती, ईद, असा सोहळ्यात आपले कर्तव्य पार पडताना व्याख्यान व इतर सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायला पाहिजे पण मागील पानावरुन पुढे सुरू असाच कारभार सुरू आहे. रस्त्यातील दगड गोटे..कचरा काढणे स्वछता राखणे हे दिसून आले नाही.
रस्त्याने चुना टाकणे अपेक्षित होते पण भीम जयंती साठी तेवढी तत्परता दिसली नाही. एवढ्या उन्हाळ्यात लहान लेकराबाळा सह हजारो माय माउल्या जयंती मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या त्यांच्या साठी रोडवर एखादा मंडप,शामिना ,मिनरल याची का व्यवस्था नव्हती. असता टँकरचे पाणी पिणारे राहिले नाहीत. एकंदरीत नगर पालिका प्रशासनाच्या कारभारावर भीम जयंती कार्यरत मंडळ व आंबेडकरी अनुयायांनी नाराजी व्यक्त केली.
के टीआय एल ची सामाजिक बांधिलक - लोहा नांदेड नॅशनल हायवे चे काम करणारे के टी आय एल या कंपनीने सामाजिक बांधिलकी जोपासली या कंपनीने भीम जयंती निमित्त शहरात मुख्य रस्त्याने पाणी टाकले. त्यामुळे काही प्रमाणात धूळ कमी होण्यास व रोड थंड होण्यास मदत झाली.