नविन नांदेड| प्लॉटींग व्यापारी व ब्रोकर्स नांदेड शहर व ग्रामिण यांच्यातर्फे शहरी व ग्रामीण गुंठेवारी प्रमाणपत्र किमान दहा ते पंधरा दिवसामध्ये देण्याचे संबंधीत अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत,यासह विविध मागण्या असलेले निवेदन पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या कडे आर.पी.लांबदाडे सरचिटणीस नांदेड शहर काँग्रेस कमिटी यांनी केली आहे.
प्लाटींग व्यापारी व ब्रोक्ररस नांदेड शहर व ग्रामीण यांच्या तर्फे विविध मागण्या असलेले निवेदन देण्यात आले असून यात मंजुर ले-आऊट मधील ना हरकत न झालेल्या प्लॉटची गुंठेवारी करण्यात यावे, गुंठेवारी शुल्क कमीत कमी करण्यात यावे,किमान 5 ते 10 गुंठे जमीनीची रजिष्ट्री करण्याची परवानगी देण्यात यावी. ज्या जमीनीवरील आरक्षण उठलेले आहे त्या प्लॉटचे गुंठेवारी करण्यात यावी, गुंठेवारीची किमान एक वर्ष मुदतवाढ करण्यात यावी. 2020 पुर्वी तयार केलेले शहरी व ग्रामिण नविन ले-आऊट ची प्लॉट नुसार गुंठेवारी करण्यात यावी, रजिष्ट्री व्यवहारा मध्ये गुन्हे नोंद झालेले तात्काळ मागे घेऊन न्याय मिळवून द्यावा. संबंधित तलाठी प्लॉटच्या फेरफार बाबत व शेतीच्या पेरा प्रमाणपत्र तात्काळ देण्याचे आदेश द्यावेत.
नांदेड शहरी व ग्रामीण भागात प्रमाणात प्लॉटींग झालेली आहे. परंतु एवढया मोठ्या प्लॉटींग मध्ये फक्त 5 ते 10 टक्के ना हरकत झालेले प्लॉटस आहेत. यापुर्वी रजिष्ट्री ऑफीसमध्ये साधे ले-आऊट व सात बारा च्या आधारावर रजिष्ट्री केली जात होती परंतु दि. १२ जानेवारी २१ रोजी नांदेणी उपमहानिरीक्षक (मुख्यालय) महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या परीपत्रकानुसार 90 टक्के रजिष्ट्रया करणे बंद झाले. वर्ष 2019 नांदेड शहर व ग्रामीण मध्ये. भागामध्ये छोट्या छोट्या प्लॉट चे ले-आऊट तयार करुन सामान्य लोकानां प्लॉट विक्री केलेले आहेत. या संपुर्ण प्लॉटींग रजिष्ट्री करणे बाकी आहे त्यामुळे सामान्य जनता व लहाण सहाण व्यापारी खुप परेशान आहेत व कर्जबाजारी झालेले आहेत.
त्यामुळे या झालेल्या ले-आऊट मध्ये प्लॉट नुसार काहीतरी मार्ग काढुन गुंठेवारी करुन देवुन सामान्य जनतेस न्याय द्यावा तसेच संपुर्ण छोटे मोठे प्लॉटींग व्यापारी अगोदरच कोरोना काळामध्ये कर्जबाजारी झाले होते ते या परीपत्रामुळे व्याकुळ होऊन गेले ना हरकत न झालेल्या प्लॉटची रजिष्ट्री होण्यासाठी गुंठेवारी सुरु करण्यात आली. परंतु नांदेड वाघाळा महानगरपालीकेत सर्व व्यवस्थीत रित्या प्रस्ताव दाखल करून ही गुंठेवारी प्रमाणपत्र मिळणे साठी किमान 3 ते 4 महिने फेरफटका मारावा लागत आहे. त्यामुळे सर्व व्यापारी व सामान्या जनता खुप अडचणित आलेली आहे. गरजेपोटी कोणालाही तात्काळ प्लॉट विक्री करता येत नाही.
त्यामुळे सामान्य मानसाची आर्थीक अडचण दूर होत नाही जर सामान्य माणसाला त्याच्या प्लॉटची गुंठेवारी प्रमाणपत्र 10 ते 15 दिवसामध्ये मिळाले तर त्यांच्या सर्व अडचणी दूर होतील त्यामुळे संबंधीत अधिकाऱ्याना 10 ते 15 दिवसामध्ये शहरी व ग्रामीण गुंठेवारी प्रमाणपत्र देण्यासाठी आदेश द्यावा तसेच वरील इतर मागण्या बाबत सामान्य माणसाची आर्थीक अडचण दूर करण्यासाठी गाभीय ने सदर मागण्याची दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करण्यात यावी आशि मागणी निवेदनाद्वारे आर.पी. लामदाडे,राजु कवटीकवार,सोपान पाटील लोंढे, किरणकुमार हिवरे,दिपक कुलकर्णी,प्रविण लाटकर, नारायण लामदाडे, गणेश धुत,विजय मोरलवार, गोविंद वटमवार, लक्षमण विभुते यांनी केली असून या निवेदनाच्या प्रति नांदेड जिल्हाधिकारी, नावामनपा आयुक्त नांदेड, तहसीलदार नांदेड यांच्या कडे करण्यात आली आहे.