हिमायतनगर, अनिल मादसवार| विदर्भ-मराठवाडा-कर्नाटक-तेलंगणा राज्यात प्रसिद्ध असलेल्या हिमायतनगर तालुक्यातील मौजे बोरगडी येथील श्री मारोती मंदिराच्या यात्रेतील सर्वात महत्वाचा व शेवटचा कुस्तीची दंगलीच फड रविवारी दुपारपासून चांगलाच गाजला आहे. आज झालेल्या दंगलीत अव्वल नंबरच्या मानाची कुस्ती निलेश शंनेवाड याने जिंकली तर दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती मल्लेश शंनेवाड याने जिंकलाय. या दोघांनाही जाहीर केलेल्या ३००१ रुपयाच्या बक्षिस देऊन गौरवण्यात आले आहे. या दोन्ही पैलवानांची युवकांनी जल्लोषात मिरवणूक काढली आणि त्यानंतर मारोतीरायाचे दर्शन घेतले. या कुस्तीच्या खेळात सहभागी होण्यासाठी नांदेड, देगलूर, पुसद यासह दूरदूरवरून पैलवान दाखल झाले होते.
त्यानंतर विदर्भ - मराठवाड्यातून दाखल झालेल्या अनेक नामांकित मल्लांच्या कुस्त्या पार पडल्या. प्रमुख कुस्त्यांपैकी पहिल्या मनाच्या कुस्तीसाठी ४००१ रुपयाचे प्रथम बक्षीस, दुसर्या क्रमांकास २००१ रुपये, तिसर्या क्रमांकाच्या मल्लास १०११ रुपयाचे बक्षीस ठेवण्यात आले होते. तसेच या व्यतिरिक्त अन्य १००१ रुपयाच्या ५ कुस्त्या तर ७०१ रुपयाच्या तीन कुस्त्या तर ५०१, १५१ च्या अनेक कुस्त्या खेळण्यात आल्याचे संयोजक व गावकऱ्याच्या वतीने सांगण्यात आले आहे. शेवटची मनाची आणि पहिल्या क्रमांकाची कुस्ती निलेश शंनेवाड आणि मन्मथ देगलूर यांच्यात झाली. तर दुसरी कुस्ती अर्धापूरच्या साई कदम आणि बोरगडी येथील मल्लेश शंनेवाड यांच्यात झाली. जवळपास दोन्ही कुस्त्या १५ ते २० मिनिट चालल्या. या कुस्तीच्या फडात देगलूरच्या मल्लास चित्त करून हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी येथील निलेश शंनेवाड यांने पहिली कुस्ती जिंकली. तर दुसरी कुस्ती मल्लेश शंनेवाड याने अर्धापुरच्या प्रतिस्पर्धी पैलवानास चित्त करून जिंकली. या दोन्ही विजेत्या पैलवानास प्रत्येकी ३००१ रुपयाचे बक्षीस देऊन मंदिर कमिटीच्या वतीने गौरविण्यात आले.
कुस्ती जिंकल्यानंतर विजेत्या दोन्ही पैलवान भावांची भव्य मिरवणूक मारोती मंदिरापर्यंत काढण्यात आली यावेळी जय बजरंग बली... जय हनुमान अश्या नामघोषाने परिसर दणाणून निघाला होता. यावेळी मंदिर ट्रस्टचे अश्याक्ष, उपाध्यक्ष, संचालक, यात्रा कमेटी सदस्य व हजारो कुस्ती शौकिनांच्या उपस्थितीत कुस्त्या पार पडल्या. कुस्तीच्या रंगतदार फड पाहण्यासाठी हदगंाव, हिमायतनगर, किनवट, भोकर, पुसद, उमरखेड, अर्धापूर, नांदेड, परभणीसह यासह तेलंगणा राज्यातील दुर-दुरच्या ठिकाणाहुन पैलवान व कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.