गेल्या वर्षी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या १८ जणावरांचा अद्याप मावेना मिळाला नाही
अर्धापूर तालुक्यातील लहान येथील सुधाकरराव इंगळे यांच्या शेतात चंद्रकलाबाई रमेशराव पाणबुडे यांच्या शेळ्यांचा कळप होता, गुरुवारी रात्री अंधारात बिबट्याने या शेळ्यांच्या कळपावर हल्ला चढवला, यावेळी एक वीस हजारांची शेळी बिबट्याने फस्त केली, बाकीच्या शेळ्यांने अचानक झालेल्या हल्ल्याने आरडाओरडा करताच शेतमजुरांची आरडाओरड केली. तर यावेळी बिबट्या एक शेळी फस्त करुन पसार झाला.
यामुळे सध्या हाळदीची जागल व कॅनाल व विहीरीचे पाणी पिकांना देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री शेतात मुक्कामी जावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांत अनेक महिन्यांपासून भिंतीचे वातावरण पसरले आहे. याकामी अनेकदा निवेदने देऊनही वनविभागाला बिबट्याला पकडता आले नाही, त्यामुळे याकामी उच्चस्तरीय कारवाई होऊन बिबट्याला जेरबंद करुन शेतकऱ्यांना, संबंधीतांना जनावरांचा मावेना मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.