हिमायतनगर। समाजातील अनाथ लेकीबाळी बद्दल आपुलकी हेवा वाटतो याच उत्तम उदाहरण म्हणुन जवळगावच्या सटवाजी पवार सर यांच नाव घेता येईल, विजया अनाथ असुन तीचे लग्न होणार आहे, परंतु लग्नासाठी परीवाराची खर्च करण्याची एैपत नसल्याने नांदेडच्या साईप्रसाद परीवाराने भरभरून मदत केली. हि बातमी वाचनात येताच सटवाजी पवार सर यांनी विजयाचे घर गाठुन गंगाजमुना घागर पितळेची परात भेट दिली यामुळे त्यांच कौतुक होत आहे.
पवार सर यांचा सामाजीक कार्यात नेहमी हातभार लागलेला असतो, सामाजीक कार्याला इश्वरी कार्य असल्याच ते मानतात, इतरांसाठी काहीतरी करण्याची धडपड तरूणांना प्रेरणा देवुन जाते.
सरसम येथिल अनाथ विजया विठ्ठल शिंदे हिच्या विवाहाची बातमी सटवाजी पवार सर यांना समजताच त्यांनी सरसम येथे विजयाच्या घरी येऊन कन्यादान रूपात गंगाजमुना घागर व पितळेची परात देऊन कन्यादानास मदत केली. नुसती मदत केली नाही तर जेंव्हा केंव्हा माझी गरज पडेल त्या वेळी मला कळवा अस त्यांनी लेकी प्रमाण विजयाला सांगितल. यावेळी त्यांच्यासोबत दापकेकर सर होते. विजयाचा विवाह सावळेश्वर ता. उमरखेड येथे दि. १५ शुक्रवारी सकाळी १०:३१ वाजता होणार आहे.
सरांनी सामाजीक जाणीवांच भान ठेवुन केलेल्या मदती नंतर घरी आलेल्या वऱ्हाडी मंडळींनी त्यांचं तोंड भरून कौतुक केल, आपण स्वतःसाठी तर जगतो परंतु स्वतःबरोबर इतरांची काही गरज भागू शकतो का? काही मदत करू शकतो का? आपल्या थोड्या मदतीमुळे कुणाच जीवन सुखी होत असेल तर ती मदत सार्थकी लागेल, हाच खरा मानवधर्म असल्याची प्रतिक्रिया सटवाजी पवार सर यांनी दिली.