हदगाव,शे चादपाशा| शेतात काम करीत असताना रानडुकराने अचानक हल्ला चढवून शेतमजुराला जखमी केल्याची घटना कोथळा शिवारात आज दि. 18 रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.
हदगाव शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर पैनगंगा नदी तीरावर असलेल्या कोथळा शिवारात विजय सुर्यवंशी यांचा शेतातील सालदार देवीदास ऊर्फ मोदी रामराव वानखेडे वय 35 रा.कोथळा (जुना) नेहमीप्रमाणे शेतात काम करीत होता. अचानक रानडुकराने केलेल्या हल्ल्यात शेतमजुराच्या पाठीला हाताला गंभीर दुखापत झाली.
कोथळा शिवारात रानडुकरा मुळे शेतकऱ्यांत दहशतीचे वातावरण पसरले आहे. पाण्यासाठी वण्यप्राणी भटकत आहे तर काही गावाजवळ तर काही शहरा भोवती दिसत आहे माञ वनपरिक्षेञ हदगाव विभाग माञ या बाबतीत काहीच हलचल दिसुन येत नाही हे उल्लेखनीय आहे.