अर्धापूर| भारतीय घटनेचे शिल्पकार,महामानव,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त अर्धापूर येथील प्रज्ञा बौध्द विहारात (ता.१८) सकाळी ०६ वाजता १८ तास अभ्यासाला सुरुवात करण्यात आली.
प्रथम सत्रात तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. दीपपूजा धूपपूजा पुष्पपूजा तसेच त्रिशरण पंचशील पाठांतर करण्यात आले. दुपारच्या सत्रात अभ्यासाका मधील विद्यार्थ्यांना पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनी अल्पोहार म्हणून केळी,चिकू, अंगूर,टरबूज ई.फळे उपलब्ध करुन दिली. विद्यार्थ्यांना फळांचे वाटप शहरातील प्रतिष्ठीत व्यक्ति व नगरपंचायतचे पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.