जिल्हा परिषदेत भरगच्च कार्यक्रमांनी भीम जयंती साजरी
नांदेड| डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मानवमुक्तीच्या विचाराचा वारसा जोपासण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन प्रा.डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी केले. नांदेड जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचारी महात्मा ज्योतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समितीच्या वतीने आज जिल्हा परिषदेत झालेल्या कार्यक्रमात व्याख्याते म्हणून ते बोलत होते.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ, सविता बिरगे, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रशांत डिग्रसकर, समाजकल्याण अधिकारी आर.एच. एडके, कार्यकारी अभियंता ए.आर. चितळे, उप शिक्षणाधिकारी दीलीप बनसोडे, बंडू अमदूरकर आदींची उपस्थिती होती.
पुढे ते म्हणाले, अनादिकापासून माणसांत सांस्कृतिक संघर्ष चालत आलेला आहे. त्यामुळे आजही माणसाला माणूसपण नाकारणा-या परंपरांचे आपण पालन करतो. हे देभरात आदिवासी, दलित व स्त्रियांच्या बाबतीत घडते. स्त्रियांना माणूस म्हणून मान सन्मान व अधिकारांचा वापर करुद्यायचा असेल तर स्त्रीचे स्वतंत्र अस्तित्व मान्य होईल. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घेऊन जगत असतांना व्देष निर्माण करणा-या परंपरांचा आपण त्याग केला पाहिजे असे मत डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी त्यांनी तथागत गौतम बुध्द, संत कबीर, संत रविदास, महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा बाबासाहेंबांनी पुढे कसा रुजवला याची दाखले त्यांनी यावेळी दिले.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अपर्ण करुन अभिवादन करुन दीप प्रज्वलाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. त्यानंतर जयंती मंडळाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शॉल व पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला. प्रारंभी जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेतून ढोल ताशांसह मिरवणूक काढून रेल्वे स्टेशन नजीक विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळयास भव्य पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर जिल्हा परिषदेत अन्नदान, मिठाई व थंड पाणी वाटपाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर दुपारी जिल्हा परिषद परिसरात न्यू सिल्वर नाईट ऑकेस्ट्राचा भिमगीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आला. पोर्णिमा कांबळे, श्रीरंग चिंतेवार, शंकर संतोडे, अविनाश भुताळे यांच्या बहारदार गीतांनी रसीकांची मने जिकंली. शुध्दोधन कदम, महेंद्र कदम, रतन चित्ते यांनी संगीत दिले. यावेळी जयंती मंडळाचे अध्यक्ष अशोक कासराळीकर, कार्याध्यक्ष सिद्धार्थ हत्तींबिरे, सचिव बालासाहेब लोणे, कोषाध्यक्ष राजेश जोंधळे, प्रसिद्धीप्रमुख मिलिंद व्यवहारे, व्ही. बी. कांबळे, डॉ. उत्तम सोनकांबळे, श्याम कावळे, सुनिल कदम, दिपक महालिंगे, गजानन अगरमोरे, छाया कांबळे, उज्वला गजभारे, पी. डी. चौदंते, सुनिता बनसोडे, यांच्यासह भिमजयंती मंडळाचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांची मोठया संख्यने उपस्थिती होती.