नांदेड ग्रामीण पर्यटन या उपक्रमांतर्गत संतकवी दासगणू महाराज प्रतिष्ठान गोरटे या तीर्थक्षेत्राचे व्हिडिओ डॉक्युमेंटरी सादरीकरण -NNL


नांदेड|
विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्या सूचनेवरून जिल्हा परिषद नांदेड आणि डाएट नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षा ठाकूर घुगे  (मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड) यांच्या संकल्पनेतील आणि रवींद्र अंबेकर  (प्राचार्य डायट नांदेड) सविता बिरगे (शिक्षणाधिकारी प्राथमिक) प्रशांत दिग्रसकर  (शिक्षणाधिकारी मा.) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या नांदेड ग्रामीण पर्यटन या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक ठेवा यांचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने YouTube live च्या माध्यमातून आजच्या वेबिनार सीरिजमध्ये संतकवी दासगणू महाराज प्रतिष्ठान गोरटे या तीर्थक्षेत्रावर आधारित डाक्युमेंट्री सादरीकरण करण्यात आले.

सदर कार्यक्रम डॉ.रवींद्र अंबेकर, प्राचार्य डायट नांदेड, श्रीकिशन देशमुख (जेष्ठ अधिव्याख्याता), साखरे (अधिव्याख्याता), मिलिंद व्यवहारे (जनसंपर्क अधिकारी) व जिल्ह्यातील पर्यवेक्षीय अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी यांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठअधिव्याख्याता श्रीकिशन देशमुख यांनी केले. प्राचार्य रवींद्र आंबेकर यांनी आपल्या मार्गदर्शनात नांदेड ग्रामीण पर्यटन या उपक्रमामागची भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा संतकवी दासगणू महाराज प्रतिष्ठान गोरटे चे विश्वस्त सचिव श्री विक्रम विनायकराव नांदेडकर यांची प्रकट मुलाखत गोवर्धन शिंदे यांनी घेतली.

मुलाखतीदरम्यान संतकवी दासगणू महाराज यांचे गोरटे येथे येण्यामागचे कारण, दासगणू महाराजांची ग्रंथसंपदा, समाज व राष्ट्र उपयोगी कार्य, दासगणू महाराज प्रतिष्ठानच्या निर्मितीचे उद्दिष्ट, प्रतिष्ठानचा कारभार, येथे होणाऱ्या विविध उत्सव कार्यक्रमांचा समाजातील व्यक्तींच्या जीवनपद्धतीवर होणारा सकारात्मक परिणाम, स्वामी वरदानंद भारती यांचे प्रतिष्ठानच्या निर्मितीमधील योगदान, दासगणू महाराज प्रतिष्ठानचे कार्य संपूर्ण भारतामध्ये परिचित होण्यासाठी प्रतिष्ठानचे धोरण, प्रतिष्ठानची वेबसाईट ऍप इत्यादी बाबींचा उलगडा श्री विक्रमजी नांदेडकर यांनी केला.

विक्रमजी नांदेडकर यांनी आपल्या मुलाखतीतून विद्यार्थी, नवयुवकांना मोलाचा सल्ला दिला. संतकवी दासगणू महाराज प्रतिष्ठानच्या वतीने नांदेडच्या जिल्हा परिषद शाळांना बोधकथेचे पुस्तक देण्याचे आश्वासन श्री नांदेडकर यांनी यावेळी दिले. याप्रसंगी जिल्ह्यातील विविध शाळांच्या विद्यार्थी, शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे विक्रम नांदेडकर यांनी दिली.

या व्हिडिओच्या निर्मितीसाठी उमरी तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी प्रल्हाद कदम, शिक्षण विस्तार अधिकारी कदम, शिक्षण विस्तार अधिकारी मोकळे, तसेच रामदास टेकाळे आणि तांत्रिक सहकार्य संतोष केंद्रे (विषयसहायक, डायट नांदेड) यांनी केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंधीतांडा येथील शिक्षक गोवर्धन शिंदे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अब्दुल्लापुर वाडी येथील शिक्षक संजय राठोड, आणि वाघलवाडा येथील शिक्षक अलीम शेख यांनी विडिओ चित्रीकरण केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी