नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील जैवशास्त्र संकुलामध्ये ‘ऍडव्हान्सेस इन बायोअॅक्टव्ह मॉल्यूक्यूल्स’ या विषयावर दि. ७ ते ९ एप्रिल दरम्यान आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न झाली. या परिषदेचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एल. एम. वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या आंतरराष्ट्रीय परिषदेस इंग्लंड, जर्मनी, चीन, थायलंड या देशातील शास्त्रज्ञांनी सहभाग नोंदविला भारतातील अग्रगण्य संस्थेतील २४ शास्त्रज्ञांनी ऑफलाईन प्रत्यक्ष व ऑनलाईन (व्हर्च्युअली) सहभाग नोंदवला. या परिषदेस प्रामुख्याने डॉ. बबन इंगोले (एन.सी.पी.ओ.आर. गोवा,) डॉ. हिरेंद्रनाथ शर्मा (ईटानगर, अरुणाचल प्रदेश,) डॉ. ओमकुमार (एन.सी.बी. त्रिवेंद्रम,) डॉ. सुटावत बेजांकुल (थायलंड), डॉ. विजय उपाध्याय (पारुल विद्यापीठ, बडोदा), डॉ. अरुण खरात (जेएनयू, नवी दिल्ली), डॉ. अशोक गिरी (एन.सी.एल. पुणे), डॉ. गिरीनाथ पिल्लाई (इंग्लंड), डॉ. प्रदिप (लखनौ), डॉ. अविनाश सोनवणे (आय.आय.टी. इंदौर), डॉ. हनमंत बरकते (ग्लेनमार्क फार्मा, मुंबई), डॉ. योगेश शौच्चे व डॉ. अमरजा जोशी (एन.सी.सी.एस. पुणे), डॉ. राकेश मौर्या (सी.डी.आर. लखनौ), डॉ. राधेश्याम मौर्या आणि डॉ. एस. व्यंकटरमणा (हैदराबाद विद्यापीठ), डॉ. अनिता पाटील आणि वाडेगावकर (सं.गा.बा. अमरावती विद्यापीठ), डॉ. अविनाश आडे (पुणे विद्यापीठ), डॉ. शिवराज निळे (चायना), डॉ. स्वाती पेशवे (औरंगाबाद), डॉ. कुंतन मुखर्जी (जर्मनी), डॉ. जोसेफ सेल्वीन (पुडीचेंरी),
या परिषदेस २०० पेक्षा जास्त शास्त्रज्ञ, संशोधक, विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. लाईफ सायन्सेस व फार्मसी या विषयाच्या विद्यार्थ्यांना संशोधन व औद्योगिक क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधी बाबत सखोल चर्चा झाली. यावेळी जैवशास्त्र संकुलाच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. दि. ९ एप्रिल रोजीच्या दुपारच्या सत्रानंतर समारोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी अधिष्ठाता डॉ.एल.एम. वाघमारे अध्यक्षस्थानी होते. तर डॉ.अशोक गिरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या परिषदेच्या आयोजनासाठी संकुलाचे संचालक डॉ. एस. पी. चव्हाण, परिषदेच्या संयोजिका डॉ. अनुपमा पाठक, परिषदेचे संयोजन सचिव डॉ. लक्ष्मिकांत कांबळे, डॉ. एच.जे. भोसले, डॉ. जी.बी. झोरे, डॉ. टी.ए. कदम व डॉ. बी. एस. सुरवसे यांच्यासह इतर संकुलातील प्राध्यापक, संचालक, अधिकारी आणि परिषद आयोजन समितीतील सदस्य, महाविद्यालयातील प्राध्यापक, संकुलातील शिक्षकेतर कर्मचारी व संशोधक विद्यार्थी यांनी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी करण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले.