नांदेड| डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्ये विचार आत्मसात करून शिका संघटित व्हा विचाराने प्रेरित होऊन डॉ.आंबेडकर जयंती तरूणांनी विविध ऊपकमानी साजरी करावी असे आवाहन सोनखेड पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल भोसले यांनी केले.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त ढाकणी ता.लोहा येथे २४ एप्रिल रोजी पंचशिल,निळा ध्वजारोहण ,व्याख्यान कार्यक्रम,तैलचित्र मिरवणूक,व सांयकाळी भिमगिताचा कार्यक्रमाचे आयोजन २४ एप्रिल रोजी सकाळी आकरा वाजता सोनखेड पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल भोसले, यांच्या हस्ते तर पंचशिल ध्वजारोहण मनपाचे माजी विरोधी पक्षनेते जिवन पाटील घोगरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ढाकणीचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक गोविंद टरके यांच्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवन चरित्र वर अभ्यास पुर्ण भाषणे केले.
अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन चव्हाण, स्वागत अध्यक्ष म्हणून के.एल. ढाकणीकर, तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन माजी विरोधी पक्षनेते जिवन पाटील घोगरे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन यांच्या हस्ते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती आंंनद पाटील शिंदे, माजी सपोनी के.पी.एडके,राजू लांडगे,रतन सरजे ,दता चिलपिपरे, कुलदीप गजभारे ,संदीप गजभारे,रवी गजभारे ,पंडित गजभारे ,महेंद्र कांबळे विजय कांबळे उत्तम गजभारे यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य,पत्रकार व प्रमुख मान्यवरांच्यी उपस्थिती होती.
यावेळी माजी विरोधी पक्षनेते जिवन पाटील घोगरे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने युवकांनी ग्रंथ, अभ्यास पुर्ण असलेली पुस्तके उपलब्ध करून द्यावी असे मनोगत व्यक्त केले.तर अध्यक्षीय समारोप माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन चव्हाण यांनी केले. सायंकाळी डॉ.आंबेडकर यांच्या तैलचित्र भव्य मिरवणूक गावातील प्रमुख रस्त्याने काढण्यात आली.सायंकाळी आठ वाजता भिम गितांचा जंगी सामना अशोक निकाळजे ,व गायीका धम्मदिक्षा लातुरकर यांच्या झाला. या जयंती सोहळ्या यशस्वी होण्यासाठी जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष विलास गजभारे, उपाध्यक्ष गोविंद कांबळे,सचिव बाबुराव गजभारे, महेंद्र कांबळे, गंगाधर गजभारे,प्रकाश गजभारे ढाकणीकर के.एल. के.पी.एडके,यांनी केले आहे.