नविन नांदेड| ग्रामीण पोलीस स्टेशन हदीतील प्रार्थना स्थळावरील ध्वनीक्षेपक बाबत उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ सिध्देश्वर भोरे व ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आयोजित मोलवी , पुजारी, संबंधित मंदीर ट्रस्टचे पदाधिकारी बैठकीत संबंधित विभागाच्या प्रमुखांना मार्गदर्शन केले.
राज्य शासनाच्या गृह विभागाच्या वतीने आदेशित केलेल्या आदेशानुसार प्रार्थना स्थळावरील ध्वनीक्षेपक आवाज बाबत व आगामी रमजान ईद व सण उत्सव या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे २४ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता शांतता समितीच्या पदाधिकारी व संबंधित विभागाच्ये मोलवी, पुजारी, ट्रस्टचे पदाधिकारी व प्रमुखांना पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ सिध्देश्वर भोरे व ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी मार्गदर्शन करुन प्रार्थना स्थळावरील आवाज बाबत रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत वाद्य वाजविण्यास सर्वच न्यायालयाची बंदी असल्याने या आदेशाचे पालन ,आवाजा बाबत पालन करा, निर्देश उल्लंघन झाल्यास कार्यवाही करण्यात येईल त्यामुळे आदेशाचे पालन करावे असे आवाहन केले.
वाजेगाव, धनेगाव,बळीरामपुर व ग्रामीण पोलीस स्टेशन हदीतील मोलवी,भंनते, ट्रस्टचे अध्यक्ष, पदाधिकारी यांच्या सह सामाजिक कार्यकर्ते ऊपसिथीत होते,या वेळी राज्यपाल पुरस्कार प्राप्त खंडेराव बकाल, खोसडे, सोनटक्के,पाशा यांच्यी उपस्थिती होती. यावेळी धनेगाव मुझामपेठ ग्रामपंचायतचे सदस्य अब्दुल गफार गफार,तातेराव ढवळे,संग्राम निलपत्रेवार,शेख खा लेख ,शेख कौसर,शेख एजाज शेख मगदुम, गणेश गोणे, यांनी पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ सिध्देश्वर भोरे, व ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.