डॉ. भरत जेठवानी यांची नवीन ओळख सान्वी जेठवाणी -NNL

डॉ. भरत जेठवाणी यांनी केले लिंग परिवर्तन 


नांदेड|
शहरातील सांस्कृतिक ओळख असणारे दिग्गज कलावंत डॉ. भरत जेठवाणी यांनी पुरुष हुन स्त्री रूप धारण करून स्वतःचे लिंग परिवर्तन केल्याची माहिती एका पत्रकार परिषदेच्या माध्यमाने दिली. 

लहानपणापासून आपण स्त्री असल्याचे समज असणारे असे व्यक्तिंना Gender syphoria आहे असे मेडिकल भाषे मध्ये संबोधतात व अश्या व्यक्तींसाठी मेडिकल सायन्स मध्ये लिंग परिवर्तनचे ऑपरेशन उपलब्ध असून ज्यास sex reassignment surgery (srs) असे म्हणतात. ही सुविधा भारतात उपलब्ध असल्याचे समजल्यावर डॉ जेठवानी यांनी हा धाडसी निर्णय घेत पुरुष होऊन आता स्त्रीरूप मध्ये प्रवेश केला आहे. जेठवाणी यांची नवीन ओळख म्हणून त्यांचे नाव सान्वी जेठवाणी असे ठेवण्यात आले आहे. या ऑपरेशन साठी विविध चाचण्या द्वारे या रुग्णास जावे लागते मानव रोग तज्ञ पासून ते प्लास्टिक सर्जरी करेपर्यंत याची एक मोठी प्रक्रिया आहे. हक्काचे संरक्षण 2019 या कायदे अनुसार विविध हक्क अशा व्यक्तींना मिळत आहे. जेठवाणी यांनी सदरील ऑपरेशन दिल्ली येथील ऑलमॅक या खाजगी रुग्णालयात येथे करून घेतले. हा प्रवास किती कठोर होता हे त्यांच्या बोलण्यावरून जाणवत होतं 

माणसाची ओळख ही चारित्र्याने व आत्मयाने होत असते त्यामुळे लिंग स्त्री असो किंवा पुरुष असो माणसाची ओळख माणुसकीने झाली पाहिजे असे प्रतिपादन पत्रकारांशी बोलत असताना जेठवाणी यांनी केले. लहान पणापासून मनात असलेल्या एका स्त्रीला आता समाजात देखील स्थान मिळेल समाजाने व मित्रमंडळी ने सर्वांनी मला प्रोत्साहन देऊन इथपर्यंत आणल आहे व पुढेही सहकार्य करून साथ देऊन पुढील वाटचालीस मला मदत करतील अशी आशा सर्वां कडून बाळगते असेही त्या म्हणाल्या. जेठवाणी यांनी उच्च शिक्षण प्राप्त केले असून नांदेडला सांस्कृतिक क्षेत्रात नावलौकिक मिळवून दिले आहे आणि हे कार्य सतत आयुष्यभर सुरू राहणार अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. 

समाजाच्या हितासाठी वेळोवेळी विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांनी समाजकार्य देखील केले आहे रक्तदान शिबिर आयोजित करणे, राष्ट्रीय एकता रॅली आयोजित करणे, सांस्कृतिक समारंभ भरवणे, झाडे लावणे व अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवत स्वतःची ओळख एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून देखील केली आहे आणि पुढेही सामाजिक कार्य थांबणार नाही व आणखीन अनेक मुद्दे घेऊन समाजकार्य करण्याचं त्यांनी ध्येय असल्याचे देखील सांगितले. समाजाचा दृष्टिकोन इतर लिंगा कडे बघण्याचा वेगळा असतो तो त्यांना आपल्यातला समजत नाही तर हा भेदभाव फरक मिटवून टाकायचा आहे.

माणसाची ओळख माणूस म्हणून राहिली पाहिजे यासाठी देखील ते कार्य करणार आहेत अशी माहिती दिली. अनेक लोकांना आता याबाबत उत्सुकता झाली असून अनेक संशोधकार या विषयावर त्यांच्यासोबत मिळून संशोधन करत आहेत अशी माहिती त्यांनी दिली. जेठवाणी हे नांदेड चे पहिले परीवर्तीत महिला ठरले आहेत त्यांनी हा धाडसी निर्णय घेऊन एक नवीन जीवनास प्रारंभ केला आहे. आज मेडिकल सायन्सने इतकी प्रगती केली आहे हा त्याचा एक उदाहरण नव्हे का? माणसाचा आयुष्य आपल्या पद्धतीने कसं जगता यावं हादेखील याचाच उदाहरण आहे असं वाटतं.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी