"भारतीय संविधानातील मूल्य समाजात रुजविणे काळाची गरज": प्रा. डॉ राजेंद्र गोणारकर -NNL


नविन नांदेड|
जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय व संशोधन केंद्र, सिडको नवीन नांदेड आणि महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड यांचे संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त "समतेचा जागर सप्ताह" कार्यक्रमांतर्गत "भारतीय संविधान आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर" या विषयावर आयोजित कार्यक्रमात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील माध्यम शास्त्र संकुलाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी या प्रसंगी वरील उद्गार काढले. 

श्री.सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी डॉ.नानासाहेब जाधव यांच्या प्रेरणेने आणि  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डब्ल्यू.आर.मुजावर व डॉ. तेजस माळवदकर  सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक समता जागर सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे IQAC विभागाच्या प्रमुख डॉ. मनीषा मांजरमकर  ह्या होत्या, तर प्रा. डॉ. रावसाहेब दोरवे, प्रा. डॉ. एन.जी.पाटील,आदींची मंचावर उपस्थिती होती. डॉ. राजेंद्र गोणारकर मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले भारतीय संविधान हे जगातील आदर्श  संविधान असून भारतीय संविधानाचा केंद्रबिंदू हा देशातील माणूस आहे आणि संविधानाला मानव कल्याण अभिप्रेत आहे. 

देशातील प्रत्येक माणूस भारतमाता आहे भारत माता की जय म्हणजे प्रत्येक माणसांचा जय आहे. भारत माता स्वतंत्र म्हणजे प्रत्येक माणसाला स्वातंत्र्य, समृद्धी, स्वतः स्वातंत्र्य, विजय, प्रत्येक माणसांचा विजय आहे . भारत माता की जय आहे जात, धर्म, पंथ, भाषा, प्रांत आणि प्रदेश, सांप्रदाय विरहित समाजाची निर्मिती भारतीय संविधानाला अभिप्रेत आहे. आपल्या देशातील महान संत रविदास यांना बेगमपुरा निर्माण करायचा होता बेगम म्हणजे दुःख नसलेला समाज, सुखी समाज भगवान महावीर यांना शांतताप्रिय समाज निर्माण करायचा होता, संत कबीर यांना भारतात प्रेम नगर निर्माण करायचे होते म्हणजे  द्वेष विरहित, हिंसा विरहित समाज निर्माण करण्याचे स्वप्न होतं. गौतम बुद्धांना सुद्धा शांतताप्रिय कल्याणकारी राष्ट्र निर्माण करण्याचं स्वप्न होतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या महान महात्मा संतांचा विचार, मूल्य भारतीय संविधानामध्ये प्रतिबिंबित केलेल आहे. 

हे आपणास संविधानाच्या मूल्यावरून जाणवते असे मत डॉ.राजेंद्र गोणारकर यांनी व्यक्त केले. देशातील प्रत्येक माणसाचं कल्याण आणि विकास साधायचा असेल तर भारतीय संविधानातील मूल्य समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत रुजवणे ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट मत डॉ. राजेंद्र  गोणारकर यांनी स्पष्ट केले. आणि ते पुढे म्हणाले की, भारतीय समाजातील वाईट रूढी परंपरा नष्ट व त्यांना तिलांजली  देऊन मानव विकासाला मारक अशा परंपरांना तिलांजली देऊन समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता आणि राष्ट्रीय एकात्मता ही मूल्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये समाविष्ट केलेली आहेत. या संविधानिक मानवी कल्याणाच्या मूल्यांचा जागर समाजातील घटकांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट मत डॉ. गोणारकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्षीय ,समारोपप्रसंगी प्रा. डॉ. मनीषा मांजरमकर यांनी समाजकार्याच्या विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानातील समतेचा जागर या कार्यक्रमांतर्गत समाजातील विविध घटकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवाव्यात असे मत मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. रावसाहेब दोरवे यांनी केले.   

स्नेहल सरोदे यांनी पाहुण्यांचे शब्द सुमनाने स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सत्वशीला वरघंटे यांनी केले. मान्यवरांचे आभार डॉ. दिलीप काठोडे यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील  प्रा.डॉ. अशोक वलेकर ,प्रा. डॉ. मेघराज कपूरडेरिया,ग्रंथपाल सुनील राठोड प्रा.डॉ. विद्याधर रेड्डी, प्रा.डॉ ए. ए. शेख , प्रा.डॉ. शिवाजी शिंदे , बळीराम गुंडे,  संतोष मोरे , राजेश पाळेकर,  सुनील कंधारकर तसेच या कार्यक्रमास विद्यार्थीत्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी