शिवणी, प्रकाश कार्लेवाड| किनवट तालुक्यातील शिवणी व परिसरातील विविध तांड्या-वाड्यात भारतरत्न घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.शिवणी ग्रामपंचायत कार्यालय येथे घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमिताने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी अभिवादन केले. तर जयंती निमित्त कॉ.अर्जुन आडे,भाजपाचे गणपत राठोड यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. या वेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाला विविधतेतून एकतेचा संदेश देणारे संविधान दिले.
देशासाठी व बहुजनांसाठी केलेल्या विविध कार्याची सविस्तरपणे माहिती सांगितली. पुढे बोलताना म्हणले की, युवकांनी डॉ.बाबासाहेबांचे आदर्श घेऊन आपले जीवन उज्वल करावे असे मत व्यक्त केले.या यावेळी येथील ग्रामविकास अधिकारी,जी. एन.धसकनवार,सरपंच प्रतिनिधी भागोराव डुडूळे,उपसरपंच प्रतिनिधी संतोस जाधव, संग्राम बिरकुरे, दिगंबर बोंदरवाड,यादव आमले, रामचंद्र खंडेलवाड, बन्सीलाल आडे,बाबू मुद्दलवाड, लाईनमन राहुल वाठोरे, गोपाळ सिरगुळे, मसाजी कसबे,राम खंडेलवाड,दिनेश अष्टपोलु,खंडू मेंढके,नागेश बेलयवार, पोषट्टी पबितोलू,सह गावातील युवक व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
मराठी पत्रकार संघाचे किनवट तालुका सचिव प्रकाश कार्लेवाड यांनी या जयंती कार्यक्रमाचे संचलन व आभार व्यक्त केले.या सह शिवणी,अप्पारावपेट सह परिसरातील सर्व वाडी-तांड्यातिल ग्रामपंचायत कार्यालय व प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र आणि शाळा विद्यलया शासकीय निमशासकीय कार्यालयात जयंती निमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.