अध्यक्षपदी अशोक कासराळीकर, कार्याध्यक्ष सिध्दार्थ हत्तीअंबिकरे तर सचिवपदी बालासाहेब लोणे यांची निवड
नांदेड| नांदेड जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचारी महात्मा ज्योतिराव फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती 2022 ची कार्यकारणी निवड करण्यात आली आहे. यात अध्यक्ष म्हणून अशोक कासराळीकर, कार्याध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे तर सचिव बालासाहेब लोणे यांनी निवड करण्यात आली आहे.
नांदेड जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज बैठक घेऊन सदर कार्यकारणी निवडण्यात आली आहे. यात कोषाध्यक्ष राजेश जोंधळे, उपाध्यक्ष श्याम कावळे, पवन तलवारे, सुनील कदम, राघवेंद्र मदनुरकर, गोटामवड, विजय वाघमारे, सल्लागार म्हणून डॉ.उत्तम सोनकांबळे, परमेश्वर गोणारे, प्रल्हाद थोरवटे, उत्तम वाढवे, जीवन कांबळे, दीनानाथ जोंधळे, व्ही.बी.कांबळे यांची निवड करण्यात आली. संघटक पदी सुनील वाघमारे, रंजीत गजभारे, सचिन ढवळे, दीपक महालिंगे, बालाजी थोटवे, सचिन गुंडाळे,
सहसचिव प्रताप रायघोळ, निलेश गोधने, धनंजय घुमलवाड, संतोष कुलकर्णी, अशोक बनसोडे, प्रमोद गायकवाड, विजयसिंह चौहान, प्रसिद्धीप्रमुख म्हणून मिलिंद व्यवहारे, डॉ. विलास ढवळे व गणेश आंबेकर यांची निवड करण्यात आली. यात महिला प्रतिनिधी किर्ती निवळे, छाया कांबळे, वंदना बावगे, उज्वला गजभारे वरवंटकर, पी.डी. चौदंते, शालिनी शेळके, स्वाती जोंधळे, सुनिता बनसोडे तर कार्यकारणी सदस्य म्हणून अभिजीत कांबळे, अशोक सोळंके, बालाजी मामूलवार, अमोल बंड्रेवार, सुदर्शन मस्के, पी.पी. पिंपलढवकर, अशोक बनसोडे, तुमेदवार, महेश लोणीकर, विजय थोरात,संजीव पाईकराव, रवी कांबळे यांचा समावेश आहे.