कार्ल्यातल्या शेतकऱ्याच्या शेतातील हरभऱ्याच्या गांजिला अज्ञातांनी लावली आग -NNL

शेतकऱ्याचे झाले लाखोंचे नुकसान 

हिमायतनगर,अनिल मादसवार| तालुक्यातील मौजे कार्ला पी.येथील एका शेतकऱ्याने बटाईने केलेल्या शेतातील दीड एकरातील हरभऱ्याच्या गंजीला कोण्यातरी अज्ञातांनी आग लावली आहे. हि घटना रामनवमीच्या रात्रीला घडली असून, यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. या घटनेचा पंचनामा आकारून नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी केली जात आहे. 


याबाबत सविस्तर वृत्त असे कि, यंदा खरिपात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीमुळे अगोदरच शेतकरी हैराण झाला आहे. या नुकसानीतून सावरण्यासाठी मौजे कार्ला पी. येथील शेतकरी दत्ता यमजलवाड यांनी हिमायतनगरचे शेतकरी बंडू भंडारे यांच्या शेत सर्वे नंबर २५० मधील दीड एकर शेत बटाईने केले. आणी त्यात खरिपाचे नुकसान भरून काढणासाठी हरभरा घेतला होता. त्या हरभऱ्याची काढणी करून गंजी मारून ठेवली होती. तसेच त्यांच्या स्वतःचं शेतातील उन्हाळी ज्वारीचाही ढग करण्यात आला. होता. हल्लर मशिन उपलब्ध झाल्यानंतर शेतीमाल काढण्याच्या तयारीत शेतकरी होता.


दरम्यान रामनवमीच्या दिवशी सायंकाळी नित्त्याप्रमाणे ते घराकडे आल्यानंतर रात्र्री् कोण्यातरी अज्ञाताने शेताती हरभऱ्याच्या ढगाला आग लावली. त्याच्या बाजूला असलेल्या उन्हाळी ज्वारीला हि आग पोचली. मात्र वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने ती विझवली गेली. परंत्तू हरभऱ्याच्या गंजीस आग लागुुन राख झाली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले असून, या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी