लोहा| निळ्या सैनिकांची ही निळी सलामी ......कसा शोभला असता भीम माझा..टाय अन कोटावर ..असा एकापेक्षा एक क्रांतिकारी भीम गीतांवर हजारो भीम सैनिक थिर्कले.. दोन वर्षांच्या कोरोना काळा नंतर लोह्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसाठी मिरवणुकीत मोठा जनसागर उलटला होता.
शहरात निळ्या कमानी तसेच झेंडे..बोलो रे बोले ...जयभीम बोलो...ढोली..बाजा...आणि फटाक्यांची आतिषबाजी असे निळे वातावरण सगळीकडे होते जुन्या शहरात युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर चिखलीकर यांच्या हस्ते पंचशिल तर माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम यांच्या हस्ते निळा ध्वजारोहण झाला. त्यानंतर डॉ बाबासाहेब यांचा स्टॅच्यु ऑफ नॉलेज या मिरवणुकीतील पुतळ्याचे अनावरण व पुष्पहार प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा-मारुती मंदिर मार्गे पुन्हा शहरातून भव्य मिरवणूकिस सुरुवात झाली. तत्पूर्वी जुन्या शहरातील त्रिरत्न बुद्ध विहारात माजी आ रोहिदास चव्हाण व नगरसेवक संभाजी चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
क्रांतीसुर्य बुद्धविहार येथे पंचशील ध्वज आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते तर निळाध्वज नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांच्या हस्ते झाला जायकवाडी वसाहत येथे पंचशील ध्वज बी बी गायसमुद्रे यांच्या हस्ते तर ज्ञानदीप बुद्ध विहार येथे पार्वतीबाई सोपानराव ढवळे व ज्ञानोबा हानवते यांच्या हस्ते तर इंदिरानगर येथे पंचशील ध्वज सटवाजी गोडबोले निळाध्वज ज्येष्ठ कार्यकर्ते बळीराम थोरात यांच्या हस्ते झाले. सिद्धार्थनगर येथे पंचशील ध्वज नगरसेवक भास्कर पाटील पवार व निळाध्वज तुकाराम कापुरे , बी एन सोनकांबळे यांच्या हस्ते झाल. जिज्ञासा अभ्यासिका मध्ये युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, किरण सावकार बाळू पाटील कऱ्हाळे, नायब तहसीलदार अशोक मोकले, केशवराव मुकदम, याच मान्यवरांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले आयोजन हरिहर धुतमल ,काशीनाथ सिरसिकर, प्रवीण धुतमल यांनी केले होते.
भाजपा तालुका अध्यक्ष आनंदराव पाटील शिंदेउपजिल्हा प्रमुख बाळासाहेब पाटील कराळे केशवराव मुकदम, काँगेस शहराध्यक्ष वसंतराव पवार, माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल, शरद पाटील पवार, बालाजी खिलारे , पंचशिल कांबळे, पोलीस पाटील श्रीरंग महाबळे, उतम् महाबळे, सोनू संगेवार, दता वाले माजी सभापती शंकर पाटील , गंगाधर महाबळे, व्ही के कांबळे, इ जे बनसोडे, सुरेश महाबळे , यासह मोठ्या संख्येनी कार्यकर्ते उपस्थित होते.
बौद्ध पूजा पाठ भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष एसएन शिंनगार पुतळे, जिल्हा पर्यटन सचिव रत्नाकर महाबळे. तालुका सरचिटणीस बापूसाहेब कापुरे. कोषाध्यक्ष धोंडीबा यानभुरे, सिद्धार्थ महाबळे, शरद कापुरे, व पदाधिकारीयांनी केले. जयंती मंडळ समितीचे, रत्नाकर महाबळे , अनिल धुतमल, सतीश नखाते. केतन खिल्लारे. सतीश निखाते. मंगल सोनकांबळे, लकी फुलवरे, भारत महाबळे, प्रवीण धुतमल. निखिल महाबळे , बाळू थोरात.डी एन कांबळे, प्रवीण महाबळे, सिद्धार्थ महाबळे, धीरज जोंधळे, सदानंद महाबळे, जॉन महाबळे ,सूरज जोंधळे यासह कार्यकर्ते जयंती सोहळा यशस्वी साठी परिश्रम घेतले.