सुजलेगांव येथे रामनवमी व हनुमान जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह -NNL


नायगाव, दिगंबर मुदखेडे|
नायगाव तालुक्यातील सुजलेगाव येथिल हनुमान मंदिराच्या भव्य पटांगणात प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दि 10/04/2022 ते दि 17/04/2022 पर्यंत रामनवमी व हनुमान जन्मोत्सवा निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व करुणाष्टक प्रवचनकार वेदशास्त्रसंपन्न श्री ज्ञानेश्वर महाराज लाटकर यांचे व पुढील सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

अखंड हरिनाम सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम पाहटे 4 ते 6 काकडा 6 ते 7 विष्णु सहस्त्रनाम 7 ते 9 ज्ञानेश्वरी पारायण 10 ते 01 गाथा भजन दुपारी 5 ते 7 हरिपाठ , 9 ते 11 हरिजागर किर्तन. दि 10/04/2022 रोजी ठीक सकाळी 9 ते 12 ह.भ.प. दिगंबर जाधव याचे रामजन्मोत्सव किर्तन सायंकाळी कीर्तनकार हरिभक्त परायण मारुती महाराज आंबुलगेकर यांचे कीर्तन, दि 11/04/2022 रोजी. सायंकाळी 9 ते 11 किर्तन ह.भ.प. परमेश्वर महाराज महाराज औराळकर दि 12/04/2022 रोजी. सायंकाळी 9 ते 11 किर्तन ह.भ.प. रामेश्वर महाराज केंद्रे नग्दरीकर,13/04/2022 रोजी. सायंकाळी 9 ते 11 किर्तन ह.भ.प. वासुदेव महाराज कोलंबी कर,14/04/2022 रोजी. सायंकाळी 9 ते 11 किर्तन ह.भ.प. गणपती महाराज देगावकर, 15/04/2022 रोजी. सायंकाळी 9 ते 11 किर्तन ह.भ.प. किशन महाराज कुदळेकर.

16/04/2022 रोजी.सकाळी हरिभक्त परायण दिगंबर महाराज यांचे हनुमान जन्मोत्सव किर्तन सकाळी 5 ते 7 व दुपारी 5 ते 8 महाप्रसाद, सायंकाळी 9 ते 11 ह.भ.प. पंढरी महाराज पळसगावकर यांचे कीर्तन, 17/04/2022 रोजी.सकाळी 9 ते 12 ह.भ.प. दिगंबर महाराज गडगेकर यांचे काल्याचे किर्तन व सायंकाळी 5 ते 6 वाघाचा कार्यक्रम व त्याच प्रमाणे सायंकाळी 8 ते 11 रात्री शाहीर दिगु तुमवाड यांचा संच व कलाकार शाहिरी व मनोरंजन कार्यक्रम होणार असून, सप्ताहात दररोज महाप्रसाद होणार आहे. तरी परिसरातील भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावे कार्यक्रमाचे आयोजन श्री संतोष महाराज देशमुख सुजलेगावकर यांनी केले आहे. असे आवाहन समस्त गावकरी मंडळ श्री महारुद्र हनुमान मंदिर ट्रस्ट सुजलेगाव याच्या वतीने करण्यात आले आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी