परिषदेच्या नांदेड शाखेने आयोजित केलेल्या कृतज्ञता समारंभाच्या अध्यक्ष पदावरून ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती अपर्णा नेरलकर यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना ठाले पाटील पुढे म्हणाले, खरं म्हणजे हैदराबाद मुक्ती संग्रामाचे आणि साहित्य परिषदेचे कार्यकर्ते त्यावेळी एकच होते. जुलमी राजवट उलथून टाकण्यासाठी निर्माण झालेली ही जगातील एकमेव साहित्यिक संस्था होय.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहित्यिक देवीदास फुलारी यांनी केले. यावेळी आयुक्त डॉ. सुनील लहाने, अपर्णा नेरलकर, प्रभाकर कानडखेडेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगंबर कदम यांनी केले तर आभार अॅड. विजयकुमार भोपी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखेचे कार्यवाह महेश मोरे, धाराशिव शिराळे, कुमार अभंगे, साईनाथ यांनी विशेष परीश्रम घेतले. यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.