माजी उपनगराध्यक्ष शरद पवार. यांचे आरोप म्हणजे लबाडाचेढोंग व साजूकपणाचे सोंग

माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम-भास्कर पाटील -आप्पाराव पवार; भाजपची पत्रकार परिषद 


नांदेड|
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी आपण जागा मिळवून दिली इथं पासून ते जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी त्यांना कसे कसे मोठे केले.मानापानाची पदे दिली. पदावर असताना एकही उल्लेखनीय काम न करता निष्क्रियता उघड झाली. सतत बनवाबनवी व समाजमन संभ्रमित करणाऱ्या  माजी उपनगराध्यक्ष शरद पवार यांच्या लबाडपणाची जंत्रीच भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत  मांडली.माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, नगरसेवक भास्कर पाटील पवार, माजी पाणी पुरवठा सभापतीआप्पाराव पवार, व पदाधिकाऱ्यांनी पुराव्यासह उघड केली. 

लोहा नगर पालिकेत उपनगराध्यक्ष शरद पवार यांच्यावर अविश्वास ठराव पारित झाला व पदच्युत।करण्यात आले त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन खा.चिखलीकर यांच्यावर उपकाराची कृतघ्नेतेने परतफेड करत बेशुट व समाजमन संभ्रमित करणारे आरोप केले. लोहा शहर व तालुक्यात स्वच्छ प्रामाणिक व शब्द प्रमाण मानला जातो असे माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, भाजपा शहराध्यक्ष किरण  सावकार वटटमवार, गटनेते करीम शेख, नगरसेवक  भास्कर पाटील पवार, माजी पाणी पुरवठा सभापती आप्पाराव पवार,  भाजपा प्रवक्ते माधव पाटील बोरगावकर,सहित भाजपाचे पदाधिकारी यांनी पुराव्यासह आरोपाचे खंडन केले . शिवाय शरद पवार यांचा लबाडपणा व लोकांना  संभ्रमित करण्याचा  हेतू  उजागर केला.

यावेळीनगरसेवकसेवक दता वाले, नामदेव काका पवार,युवा नेते सचिन मुकदम  भाजपयुमो तालुकाध्यक्ष बंडू पाटील वडजेभाजपा विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष बाळु पाटील कदम बेनाळकर , माधव पाटील पवार, सुर्यकांत गायकवाड, भानुदास पाटील पवार,  बाळु पाटील पवार, उपस्थित होते. पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली  नगर पालिकेत नगराध्यक्षा सह भाजपची सत्ता आली त्यासाठी प्रवीण पाटील चिखलीकर व प्राणिताताई चिखलीकर देवरे या बहीण भावाचे मोठे योगदान आहे.

कोणतेही कर्तृत्व सिद्ध न करताच स्थानिकांची राजकीय पार्श्वभूमी पाहून खा चिखलीकर यांनी शरद पवार यांना नगरसेवक, उपजिल्हा प्रमुख, मार्केट कमिटीचे संचालक, दुसऱ्यांदा नगरसेवक, तेही लोह्यातील मोठे प्रस्थ असलेल्यांच्या विरोधात निवडून आणले, त्यानंतर भाजपा तालुकाध्यक्ष, शिवजयंती साठी पुढाकार, उपनगराध्यक्ष व शिवस्मारका साठी पुढे केले असा संधी दिल्या एवढेच नाही तर प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात अग्रस्थान दिले एवढे करून ही ते नेहमीच चिखलीकर कुटुंबियांच्या विरोधात सार्वजनिक ठिकाणी उघडपणे बोलत होते  ते सगळे चिखलीकर कुटुंबीयांनी सहन केले.त्यांनी  कधीच जाहीरपणे शरद पाटील यांचा अपमान केला नाही की त्याच्या विषयी जाहीरपणे अपशब्द काढले नाही .

अविश्वास ठराव आणण्यास त्याने कसे मजबूर केले.मुदत संपल्या नंतर चार पाच महिने तारीख देऊन वेगवगेले कारण देत चालढकल केली. त्याच पालकमंत्री यांना भेटून सहकार्य करण्याची विनंती केली त्यामुळे भूमिका टोकाची घ्यावी लागली. पालिकेतील वातावरण कसे गढूळ झाले यासह त्याने अविश्वास ठराव पारित झाल्या नंतर पत्रकार परिषदेत जे बेशुट आरोप केले त्या प्रत्येक आरोपांची पुराव्यासह शरद पवार यांच्या लबाडपणाची जंत्रीच पत्रकार परिषदेत उघड करण्यात आली. 

तन मन धन खर्चून निवडून  आणताना हिटरलशाही दिसली नव्हती काय? दुसऱ्याच राजीनामा मागताना किती  घाई   केली मग स्वतः का दिला नाही  राजीनामा (?) आता पर्यन्त स्वतःच्या खिशातून  किती पैसे खर्चिले ?असा अनेक प्रश्नउपस्थित करीत  लबाडीपणाची हद ओलांडणाऱ्या शरद पवार यांच्या कृतघ्नेतेची पोलखोल या पत्रकार परिषदेत करण्यात आली . खरा मुखडा जनतेसमोर  आला व येईल  असे माजी पाणीपुरवठा सभापती आप्पाराव  पवार यांनी निक्षून सांगितले. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी