लोह्यात महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा उभारावा--- कल्याणराव सुर्यवंशी -NNL


लोहा।
शहरात महात्मा बसवेश्वर यांचा भव्य दिव्य पुतळा उभारण्यात यावा यासाठी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ व माजी नगराध्यक्ष कल्याणराव सुर्यवंशी यांनी मागणी केली आहे .मान्यवरांच्या सह्याचे  निवेदन नगराध्यक्ष यांच्या कडे  देण्यात आले आहे.
    
नांदेड येथे २२रोजी महात्मा  बसवेश्वर यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण होत आहे त्या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कल्याणराव सुर्यवंशी यांच्या "  विश्वनाथ निवास"येथे नांदेड मनपा स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी, जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते संतोष पांडागळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंगनाथ भुजबळ, कंधार तालुकाध्यक्ष बालाजी पांडागळे,जिल्हा सरचिटणीस  संजय भोसीकर  यांच्या उपस्थिती समाज बांधवांनी बैठक पार पडली .नांदेड येथे महात्मा बसवेश्वर यांच्या भव्य दिव्य पुतळा अनावरण कार्यक्रमास मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन  मनपा स्थायी समिती सभापती किशोर स्वामी, बालाजी पांडागळे, संतोष पांडागळे यांनी तालुम्यातील समाज बांधव तसेच वीरशैव अनुयायी याना केले 
 
बैठकीत  कांग्रेसचे ज्येष्ठ व माजी नगराध्यक्ष कल्याणराव सुर्यवंशी   लोहा शहरात महात्मा बसवेश्वर यांचा भव्य पुतळा उभारण्यात यावा सभागृहात तसा ठराव करून शहराच्या मध्यवर्ती भागात हा पुतळा पालिकेचे उभारावा असा आशयाची मागणी केली व निवेदन नगराध्यक्ष याना देण्यात आले त्यावर नांदेड वाघाळा मनपा स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी,  जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते संतोष पांडागळे, काँग्रेसचे कंधार तालुकाध्यक्ष बालाजी पांडागाळे,  काँग्रेसचे लोहा  तालुकाध्यक्ष  रंगनाथ भुजबळ यासह दता शेटे, मलकार्जुन शेटे,  पवन वाले, शिवाजी शेटे,वीरभद्र धोंडे, युवक काँग्रेसचे माजी विधानसभा अध्यक्ष युवराज वाघमारे, शंकरराव होनराव,ज्ञानोबा वसमतकर, शिवाजी कापसे, पिंटू चुडावकर, हणमंत खेडकर, हरिहर शेटे, पांडुरंग शेटेगंगाधर  स्वामी, जळब शेवडकर,राजेश्वर व कतुर,पिंटू आप्पा वड्डे ,सतीश आनेराव,सुभाष बनसोडे,बालाजी  नागसाखरे,नागोराव  शेटे, संजय कहाळेकर यांच्या सह्या आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी