मी गृहमंत्र्यांना सांगू इच्छितो की येत्या काळात मशिदीवर लाऊड स्पीकर लावण्यासाठी जी नियमावली तुम्ही ठरवणार आहात तीच नियमावली मंदिराच्या लाऊडस्पीकर बाबत ठरवावी.. मदरशांवर देखील लाऊडस्पीकर लावलेले आहेत. 20 टक्के लाऊड स्पीकर हे मशिदीवर आहेत त्यामुळे मदरशां वरील लाऊडस्पीकरला परवानगी आहे का याची तपासणी करण्याची मागणी मोहित कंबोज यांनी केली. अनधिकृत प्रार्थना स्थळाना लाऊडस्पीकर ची परवानगी दिली जाऊ नये अशी मागणी त्यांनी केली .
माझी महाराष्ट्र सरकार ला विनंती आहे की सर्व लोकांनी एकत्रित येऊन ही सामाजिक चळवळ सुरु केलेली आहे. सुप्रीम कोर्टाचे जे काही नियम आहेत ते नियम सरकारने योग्य रीतीने राबवावे. मुंबईतून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी . मुंबईमधून सर्व देशाला दिशा मिळेल असं मोहित कंबोज म्हणाले ..