खा.हेमंत पाटील आणि आ.माधवराव पाटील जवळगावकर यांची प्रमुख उपस्थिती
हिमायतनगर| तालुका व शहर परिसरातील सर्व जनता व गरजु रूग्णासाठी आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत आरोग्य मेळाव्याचे आयोजन हिमायतनगर येथे बुधवार दि.२० एप्रिल रोजी ग्रामीण रुग्णालय परिसरात करण्यात आले आहे. या शिबिराची सुरुवात सकाळी ०९:०० ते दुपारी ०४:०० वाजेपर्यंत करण्यात आले आहे. या आरोग्य मेळाव्याचा लाभ शहर व ग्रामीण भागातील सर्वांनी घ्यावा असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डी.डी.गायकवाड यांनी केला आहे.
आरोग्य माळव्याचे उदघाटक आ.माधवराव पाटील जवळगावकर (हदगाव-हिपायतनगर विधानसभा मतदार संघ) तर प्रमुख पाहुणे म्हणून हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील हे राहणार आहेत. तसेच उपसंचालक आरोग्य सेवा लातूर येथील डॉ.हेमंतकुमार बोरसे, जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रून्णालय, नांदेडचे डॉ.निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेडचे डॉ.बालाजी शिंदे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.हनुमंत पाटील, गटविकास अधिकारी मयूरकुमार आंदेलवाड, गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती, हिमायतनगर श्री माधवराव वानोळे, बाल विकास प्रकल्प अधिकारी उमेश मुदखेडे, वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रूग्णालय, हिमायतनगर डॉ.डी.डी.गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी, हिमायतनगर डॉ.संदेश पोहरे, वैद्यकीय अधिकारी प्रा.आ.केंद्र चिंचोर्डी डॉ.दामोदर राठोड, वैद्यकीय अधिकारी प्रा.आ.केंद्र सरसम डॉ.वेभव नखाते आदींची उपस्थिती राहणार आहे.
या ओरोग्य मेळाव्यामध्ये भिषक, बालरोगतज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, कान नाक घसा तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, दंतशल्य चिकित्सक तज्ञ, त्वचा रोग तज्ञ या सर्व तज्ञाच्या सेवा उपलब्ध राहणार आहेत. आरोग्य मेळाव्यामध्ये आर्युवेद, युनानी, होमिओपॅथी तज्ञाच्या सेवा उपलब्ध राहणार आहे. वेलनेस अँक्टीव्हीटी, योगा, मेडीटेशन (ध्यान) या बद्दल समुपदेशन केले जाईल. डिजिटल आरोग्य आयडी तयार केली जाईल. एन.सी.डी.स्क्रीनींग मध्ये मधुमेह उच्च रक्तदाब मौखिक कर्करोगाचे निदान केले जाईल. आयुष्मान भारत कार्ड तयार करून दिले जाईल. विविध प्रकारच्या रक्त, लघवी तपासण्या केल्या जातील. निदान व औषधोपचार मोफत करण्यात येईल. ग्रामीण रूग्णालय हिमायतनगर येथील वैद्यकीय अधिकारी व सर्व कर्मचारी, तालुका आरोग्य अधिकारी येथील सर्व अधिकारी व कर्मचारी, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र,
वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, सर्व आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका या आरोग्य मेळाव्यात सेवा देणार आहेत. तरी या शिबिराचा शहर व ग्रामीण भागातील सर्व रूग्णांनी लाभ घ्यावा शिबिरात येताना आपले जुने कागदपत्रे, राशनकार्ड व आधार कार्ड सोबत आणने गरजेचं आहे. या सर्व रोग निदान महामेळाव्यासाठी हिमायतनगर शहर व तालुक्यातील रुग्ण व नातेवाईक यांनी मोठया संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डी.डी.गायकवाड, तालुका आरोग्य धिकारी संदेश पोहरे, अधिकारी दामोधर राठोड, वैद्यकीय अधिकारी डॉ.वेभव नखाते आणि ग्रामीण रुग्णालय व तालुका आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.