नविन नांदेड| श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताह अंतर्गत २२ ते २८ एप्रिल दिंडोरी प्रणीत उत्सव या मध्ये अखंड नाम-जप-यज्ञ सप्ताह व मोफत आरोग्य शिबीर स्थळ स्वामी समर्थ केंद्र, रामनगर, सिडको, नविन नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे. भगवान श्री स्वामी समर्थांची नाममात्र जीर्ण देह सोडण्याची तिथी. त्या दिवसाची आठवण म्हणून ७ दिवसांचा सप्ताह सर्व दिंडोरी प्रणीत “ श्री स्वामी समर्थ ” सेवा केंद्रात विशिष्ट पद्धतीने यज्ञ याग, होमहवन, जप, तप, ध्यानधारणा इ उपासना व प्रात्यक्षिकांद्वारे केला जातो.
दैनंदिन कार्यक्रम मध्ये सकाळी नित्य स्वाहाकार, गुरू चरित्र सामुदायिक वाचन, ठेवण्यात आले आहे. २१ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता ग्राम देवता निमंत्रण व मंडळ स्थापना व पुर्व तयारी,२२ रोजी सकाळी सातच्या सुमारास मंडळ स्थापना स्थापित दैवता हवन, अग्नी स्थापना निमित्त स्वाहाकार,२३ रोजी सकाळी ११ वाजता नित्य स्वाहाकार गणेश याग,२४ रोजी सकाळी ११ नित्य स्वाहाकार चडी याग,२५ रोजी सकाळी ११ नित्य स्वाहाकार, स्वामी याग,२६ रोजी सकाळी ११ नित्य स्वाहाकार विष्णू याग,२७ रोजी नित्य स्वाहाकार रूद्र याग,मल्हारी याग व २८ रोजी नित्य स्वाहाकार सत्य दत पुजन ,बली पुर्ण हुती , महानैवेद्य आरती ,मादीयाळीव सप्ताह सांगता होणार आहे.