रूद्राणी कंन्सट्रक्शन निष्काळजी पणामुळे प्रवाशांच्या डोळ्यात धुळ फेक..! -NNL

रूद्राणीच्या 'घंटा' या महाप्रतापाने नागरिकांच्या डोळ्यात धुळ फेक करून निष्कृष्ठ दर्जाचे करतो काम...


मुखेड, रणजित जामखेडकर।
मुखेड शहरातुन एन.एच १६१ए नांदेड ते बिदर हा नॅशनल हायवे जात आहे . सदरचे उस्माणनगर ते कुंद्राळा पर्यंतचे काम रुद्राणी कंन्स्ट्रक्शनकडे आहे. रुद्राणी कंपनीचे डेपोटी प्रोजेक्ट मॅनेजर राजशेखर घंटा हे ह्याच हायवेचे काम करून घेत आहेत परंतु हे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे,आणि शहरात व शहराच्या बाहेर काम करत असताना सेफ्टीच्या नावाने बोंबाबोंब आहे. तसेच रस्त्यावर पाण्याची कमतरता आणि रोड उकरल्यानंतर निकृष्ट दर्जाचे मुरूम टाकून त्यावर पाणी न वापरताच अर्धवट दबइ करून वाहणे सोडतात त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहणे बारीक-बारीक खडीमुळे व खड्ड्यामुळे स्लिप होऊन पडतात आणि एखादी मोठे वाहन रस्त्यावरून गेले तर पाच मिनिट त्या रस्त्यावर धूळ पसरते हिवाळ्यात जसे धुके पसरते तसे त्यामुळे अशा बेजबाबदार डेपोटी प्रोजेक्ट मॅनेजर राजशेखर घंटा यांच्यामुळे मुखेड तालुक्यातील जनतेच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे आणि विशेष म्हणजे या रुद्रानिच्या हलगर्जीपणामुळे बऱ्याच निष्पाप जीवांना आपले जीव गमवावे लागले.

तसेच रस्त्यावर पाणी कमी वापरणे मुरूमावर वर पाणी न टाकता दबईचे करणे काँक्रेटमध्ये सिमेंटचे प्रमाण अत्यल्प वापरणे व काँक्रीट झाल्यावर पाण्याचे पुरवठाचे प्रमाणही कमी तसेच काही ठिकाणी सब कॉन्ट्रॅक्टर लावलेले आहेत त्या सब कॉन्ट्रॅक्टर कडून सुद्धा ह्या घंटा सारख्या अधिकाऱ्यांनी निकृष्ट दर्जाचे काम करून घेत आहे त्यामुळे जनतेच्या मनात "दाल में कुछ काला है" अशी शंका निर्माण होताना दिसून येत आहे. बरोबरीच्या अजयदीप कन्स्ट्रक्शनने आपले काम वेळेत संपवले परंतु ह्या अजगराच्या कातड्या सारख्या घंटा सारख्या अधिकार्‍यामुळे रुद्राणी चे काम तब्बल पाच ते सहा वर्षांपासून ताटकळत बसले आहे.

 ज्यांच्या नियंत्रणाखाली ह्या कंपनीचे बिले निघतात व कामाची तपासणी होते असे टी.पी.एफ. ऑफिस मुखेड मध्ये आहे आणि त्यांच्यामार्फत सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकारी या कंपनीतील काम पाहत असतात परंतु ह्या रुद्राणी कन्स्ट्रक्शन वर ना टीपीएफ ऑफिस ना सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे भय राहिलेच नाही अशाच प्रकारे बेडरपणे ही कंपनी तालुक्यात काम करत आहे त्यामुळेच येथील जनतेच्या मनात रुद्राणी कन्स्ट्रक्शन, टि पी एफ ऑफिस व पीडब्ल्यूडी या तिघांच्या संगनमतानेच हा नॅशनल हायवे होत आहे की काय असा मोठ्या शंकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

तालुक्यातील जनता ही कोरोनाला कमी पण रुद्राणी कन्स्ट्रक्शनने घंटा सारख्या अधिकाऱ्यांमार्फत होणाऱ्या हायवेच्या कामाला जास्त घाबरताना दिसत आहेत. कारण काम सुरू करण्याआधी काम चालू असताना व काम झाल्यानंतर ह्या तिन्ही पद्धतीमध्ये रुद्राणी कंपनीने कुठेच सेफ्टी, दिशादर्शक फलक,पाण्याचे प्रमाण कमी अशा एक ना अनेक प्रश्नामुळे जनता वैतागली आहे.
अशा बेजबाबदार कन्स्ट्रक्शनवर कारवाई का होत नाही व अशा कन्स्ट्रक्शनला काम कसे मिळते.

 अशा कन्स्ट्रक्शन चे कॉन्ट्रॅक्ट कायमचे बंद करावे असे सूर छोटे-मोठे व्यापारी, शेतकरी, नोकरवर्ग व तालुक्यातील जनतेतून निघत आहे. कुंभकरणा यासारखे गाढ झोपेचे सोंग करत असलेल्या सामान्य प्रशासन विभागाला जाग कधी येईल व रुद्राणी कन्स्ट्रक्शन सारख्या व कंपनीत काम करणाऱ्या राजशेखर घंटा सारख्या बेजबाबदार अधिकाऱ्यावर कार्यवाही कधी करणार की तू मारल्यासारखे कर मी रडल्यासारखे करतो ह्याच म्हणीप्रमाणे चालणार आहे असा मोठा प्रश्न जनतेसमोर पडला आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी