कै.वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालयाच्या विशेष युवक शिबिराचे उद्घाटन संपन्न - NNL


नांदेड/मुजामपेठ|
देगलूर नाका नांदेड येथील कै. वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष युवक शिबिर उद्घाटन  माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री डी. पी. सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.

कै. वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालय देगलूर नाका नांदेड च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे पर्यावरण व नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन आणि स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सात दिवसीय विशेष युवक शिबिर मौजे मुजामपेठ धनेगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालय विकास समितीचे प्रा. डी. बी. जांभरुणकर हे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर  स्वयंसेविका उज्मा बेगम मोहम्मद जमील हिने खिरात म्हटली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. बाबासाहेब भुकतरे यांनी केले. जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे यांनी आपल्या शैलीत मनोगत व्यक्त केले. 

राहुल मोहनअण्णा हंबर्डे यांनी देखील समयोचित विचार व्यक्त केले. पुढे मा.डी. पी. सावंत साहेब म्हणाले की, विद्यार्थ्यांनी पारंपारिक शिक्षणाबरोबरच कौशल्य पारंगत झाले पाहिजे नवीन शैक्षणिक धोरणात पारंपारिक आणि कौशल्याधारित शिक्षणावर भर दिला आहे. शासनाच्या मार्फत चालवण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा तयारीसाठी आवश्यक असणाऱ्या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन प्रशासनामध्ये आपले स्थान निश्चित केले पाहिजे. शिक्षण घेत असताना जातीभिमान विद्यार्थ्यांनी बाजूला ठेवून ज्ञान ग्रहण करण्याकडे आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे कारण भारतासारख्या अनेक धर्म पंथ असलेल्या देशात आपण राहत असताना आपला धर्म हा आपल्या घराच्या चौकटी पर्यंतच ठेवला पाहिजे, समाजात वावरत असताना धर्मनिरपेक्ष भावनेने आपण व्यवहार केला पाहिजे हिच या देशाला मिळालेली संवैधानिक ताकत आहे. 

कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्रा. डी.बी. जांभुरूणकर यांनी केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शिवकुमार भांडवलकर यांनी केले तर आभार प्राचार्य डॉ. उस्मान गणि यांनी मानले. सात दिवसात स्वच्छता व्यसनमुक्ती सामाजिक जागृती बौद्धिक उद्बोधन या विषयावर तज्ञ मार्गदर्शन केले जाणार आहे तसेच श्रमदानातून स्वच्छता देखील केली जाणार आहे.

या कार्यक्रमास धनेगाव मुजामपेठ चे सरपंच गंगाधर पाटील शिंदे (पिंटू पाटील) ,मनोहर पाटील शिंदे, राहुल मोहन अण्णा हंबर्डे,अब्‍दुल कयूम, भुजंगराव भालके ,अब्दुल गफार अब्दुल कादर ,शेख फारुख शेख कदीर,तातेराव ढवळे, राजेश बटलावार,रफिक भाई, गोविंद मामा वांगीकर, सुभाष धुतडे मुख्याध्यापक बालासाहेब डाकोरे काय बानो एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मोहम्मद मझरोद्दीन मोहम्मद खलीलूद्दीन, प्रा खान नदीम परवेज ,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. बाबासाहेब भुकतरे, प्रा.  पुष्पा क्षिरसागर, प्रा. नुरी मॅडम, प्रा. हिना कुरेशी, प्रा. समिना, प्रा. अब्दुल अहद ,प्रा. शेख नजीर, प्रा. निजाम इनामदार, प्रा. दानिश,प्रा. सय्यद सलमान, मोहम्मद फराज, अक्षय हसेवाड, राष्ट्रीय सेवा योजना प्रतिनिधी कुरेशी मोहम्मद दाईम शेख, समीर, फरहान, मुदस्सीर, साजिद कुरेशी यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि स्वयंसेविका उपस्थित होत्या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी