नांदेड, अनिल मादसवार| होळीनिमित्त ॲड. दिलीप ठाकूर यांनी आयोजित केलेल्या महामूर्ख कवीसंमेलनामध्ये उपस्थित असलेल्या हजारो रसिकांना सायंकाळी सहा ते दहा या चार तासात निमंत्रित कवींनी आपल्या शृंगारिक गीतांनी व वात्रट विनोदांनी हास्य रसात रंगवून चिंब केल्यामुळे कोरोना नंतर आलेली होळी अविस्मरणीय ठरली.
होलिकात्सव समिती, कलामंदिर ट्रस्ट आणि लायन्स क्लब नांदेड सेंट्रल तसेच अमरनाथ यात्री संघ नांदेडच्या वतीने सतत विसाव्या वर्षी महामूर्ख कवीसंमेलन गंधर्वनगरी च्या प्रांगणात उत्साहात संपन्न झाले. मर्चंट बँक अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते व मनपा विरोधी पक्ष नेते दीपकसिंग रावत यांनी मुर्ख शिरोमणी गर्दभराज यांचे पुजन करून कविसंमेलनाचे उदघाटन केले .खास बनविलेला पुष्पहार तृतीयपंथीच्या गळ्यात भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले आणि प्रतिष्ठित व्यापारी सतीश सुगनचंदजी शर्मा यांनी टाकल्यामुळे रसिकांनी प्रचंड टाळ्या वाजवून दाद दिली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर, भाजपा दिव्यांग आघाडी प्रदेश संयोजक रामदास पाटील सुमठाणकर ,नांदेडभूषण राजेंद्र हुरणे,गुरुद्वारा बोर्डाचे सचिव सरदार रविंद्रसिंघ बुंगई, प्रतिष्ठित व्यापारी शिवप्रसाद राठी, प्रसिद्ध उद्योजक शिवाजीराव ईबितवार, प्रसिद्ध उद्योजक सन्नी गोयल,लायन्स क्लब नांदेड अन्नपूर्णा चे अध्यक्ष नागेश शेट्टी,सुमेर राजपुरोहित, बिरबल यादव यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.प्रसिद्ध उद्योजक अखिलेश गुप्ता ,भाजपा जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील धनेगावकर , लायन्स क्लब नांदेड सेंट्रल सचिव अरुणकुमार काबरा, प्रतिष्ठित व्यापारी मुरली गोयंका यांच्या हस्ते जोकर टोपी व गाठ्याचा हार घालून कवींचा सत्कार करण्यात आला.गंधर्वनगरी कलामंदिर येथील मैदानावर कापूर आणि लवंग यांची होळी करून परिसर कोरोना मुक्त करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचलन करणाऱ्या दिलीप ठाकूर यांनी सर्व मान्यवर व कर्वीवर विविध इरसाल विनोद सांगून कार्यक्रमाची झकास सुरुवात केली .हास्य सम्राट सिद्धार्थ खिलारे यांनी गायलेल्या श्री वल्ली या विडम्बन गीताने रसिकांची हसून हसून पोटे दुःखू लागली. शाहीर रमेश गिरी यांच्या सदाबहार विनोदांना तसेच आगळ्या-वेगळ्या पाळण्याला श्रोत्यांनी मनमुराद दाद दिली . बनारस इथून आलेले कवी अनिल आवारा यांनी आपला काव्य पाठ करताना मध्ये मध्ये बोम्ब मारून अडथळा निर्माण करणाऱ्या आचरट श्रोत्यांना हजर जवाबी उत्तर देऊन टाळ्या मिळवल्या.
उज्जैन येथून आलेले शायर इक्बाल नागोरी यांच्या शृंगारिक गीतातून रसिकांना होळीच्या आनंदात रंगवून चिंब केले .टीव्ही स्टार सतीश कासेवार यांच्या मिमिक्रीला प्रचंड प्रतिसाद मिळाला.पत्रकार राजेंद्र शर्मा यांनी सांगितलेल्या सह अभिनय विनोदाने रसिकांची मने जिंकली.प्रा. रविंद्र अंबेकर यांनी मनाच्या कोपऱ्यात दडलेले विनोद सांगून श्रोत्यांना मनसोक्त हसविले .सिनेस्टार लच्छु देशमुख यांनी द्विआर्थी काव्यप्रतिभेतून मनमुराद हसविले.विलास जोगदंडने देखील चांगले मनोरंजन केले.
कविसंमेलन यशस्वी करण्यासाठी राजेशसिंह ठाकूर राजू मोरे ,सदाशिव जोगदंड,आनंद गांधारी ,कामाजी सरोदे, प्रशांत पळसकर, सुरेश निल्लावार, गौतम सावने , कपिल यादव, बाळू सोनटक्के, शेखर भावसार, बबलू यादव, हुकूमसिंग गहलोत, राजेश कोण्डील, शिशुपाल अग्निवंशी, धरमसिंग परदेसी, अजयसिंह परमार, श्रीनिवास आरपीएस अण्णा यांनी परिश्रम घेतले. संपादक डॉ. जुगलकिशोर धूत, ज्येष्ठ पत्रकार गोवर्धन बियाणी, डॉ. हंसराज वैद्य यांच्या सहकार्याने गेल्या वीस वर्षापासून बनारस नंतर फक्त नांदेड येथेच होळी निमित्त आगळ्यावेगळ्या कविसंमेलनाचे आयोजन करत असल्यामुळे दिलीप ठाकूर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे .