नांदेड येथून बासर पर्यंत केवळ तासाभरात - पालकमंत्री अशोक चव्हाण -NNL

नांदेड महानगरातील दिडशे कोटी रुपये किंमतीच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन समारोहात सूतोवाच


नांदेड,अनिल मादसवार।
 इतर महानगरांच्या तुलनेत नांदेड वासियांना विविध विकास कामांसाठी सुमारे एक तपापेक्षा अधिक काळ प्रतिक्षा करावी लागली. या कालावधीत नागरिकांनी विनातक्रार अनेक असुविधा सहन केल्या. मात्र हा विकासाचा अनुशेष अडीच वर्षात जेवढ्या जलद गतीने भरून काढता येईल याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. 

मराठवाड्याच्या इतर महानगरांच्या तुलनेत नांदेड हे महानगर विविध विकास योजनांनी परीपूर्ण असलेले महानगर म्हणून ओळखले जाईलअसा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.

नांदेड महानगरातील विविध भागात विकास कामांचा शुभारंभ आज त्यांच्या हस्ते करण्यात आला. या भूमिपूजन समारंभाच्या निमित्ताने चैतन्य नगर तरोडा बु. येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष  समारंभात ते बोलत होते. यावेळी विधान परिषद सदस्य अमर राजूरकरआमदार मोहनअण्णा हंबर्डेआमदार बालाजी कल्याणकरमाजी राज्यमंत्री डी. पी. सावंतमहापौर जयश्री पावडेउपमहापौर अब्दुल गफार अ. सत्तारमनपा स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी आदी मान्यवर या समारंभास उपस्थित होते.  

तरोडा बु.निळा येथून बासर पर्यंत सुमारे 1 हजार कोटी रुपये निधीचा चांगला सिमेंटचा रस्ता पूर्ण केला जाणार आहे. बासर हे सर्वांच्या श्रद्धेचे स्थान आहे. तेलंगणाच्या सिमेवर या मार्गामुळे आता निजामाबाद पर्यंत पोहचण्याचा मार्ग अधिक सुकर व जलद होईल. या महामार्गाच्या जाळ्यातून नांदेड येथील विविध विकासालाउद्योग व्यवसायाला चालना मिळेल. नांदेड जिल्हा वासियांनी जो विश्वास दाखविला आहे त्या विश्वासाला विविध विकास योजनांच्या कर्तव्यपूर्तीतून हा स्नेह अधिक दृढ करून अशा भावना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केल्या.

नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी स्व. डॉ. शंकरराव चव्हाण यांनी जी कटिबद्धता दाखविलीकृषि क्षेत्रासह नांदेडच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा यादृष्टीने विष्णुपुरी सारखा प्रकल्प साकारलाया महानगराच्या विस्ताराच्या दृष्टिने जी पायाभरणी केली त्याचा कृतीशील वारसा व कटिबद्धता स्विकारून नांदेड जिल्ह्याच्या विकासाला कुठली कमतरता पडू देणार नाहीअशी ग्वाही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. विकासाची मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेतमी ती पाहतो. समृद्धी महामार्गाला नांदेड जोडणे हे माझे स्वप्न होते. त्याची मान्यता घेऊन पूर्तता केली आहे. प्रत्यक्षात मार्गही लवकरच साकारेल. बुलेट ट्रेन हेही स्वप्न आहे. लातूर-नांदेड वेगळा रेल्वे मार्ग हे सुद्धा स्वप्न असून त्याच्या पूर्तीसाठी प्रयत्नांची पराकाष्टा करेलअसे त्यांनी स्पष्ट केले.

नांदेडच्या विकासातला बॅकलॉक दुप्पट वेगाने भरून काढण्याची जबाबदारी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्विकारली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेउपमुख्यमंत्री अजित पवार व सर्व विभागाने नांदेडच्या विकासाला खंबीर साथ दिली आहे. सर्वांनी एकत्र येऊन विकासातील हा असमतोल दूर करण्याचा हा संकल्प असल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत यांनी केले.

गत अडीच वर्षात तरोडा भागातील विकास कामांना गती आली. विकास कामांसाठी निधी खेचून आणण्यात पालकमंत्री या नात्याने चव्हाण यांनी कुठलेही कमतरता ठेवली नाही. कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी जे समर्थ नेतृत्व दिले त्याला तोड नाही. या नेतृत्वासमवेतच विकास कामांसाठी जो विश्वास महाराष्ट्राला त्यांनी दिला त्यातून विविध योजना साकारल्या. नांदेडच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व सर्व संबंधित विभागांच्या मंत्री महोदयांशी योग्य समन्वय साधत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी विकासाला जी चालना दिली त्याला तोड नसल्याचे प्रतिपादन आमदार बालाजी कल्याणकर यांनी केले.

आमदार राजूरकर यांनी तरोडा भागातील विविध विकास कामांचा आढावा घेतला. हे शहर वरचेवर वाढत असून या भागातील नवीन कॉलनीसाठी रस्तेपिण्याचे पाणी व इतर पायाभूत सुविधा अधिकाअधिक चांगल्या कशा पोहचविता येतील याकडे आम्ही भर देत असल्याचे सांगितले. यावेळी महापौर जयश्री पावडे यांचे समवोचित भाषण झाले. या कार्यक्रमाचे संचलन संतोष पांडागळे यांनी केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी