नांदेड| महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धच्या बाराव्या दिवशी शाक्य सर्वांगीण विकास प्रतिष्ठाण, परभणीच्या वतीने नारायण जाधव लिखित, सुनील ढवळे दिग्दर्शित "यशोधरा" या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण झाले.
यशोधरा या नाटकात भगवान बुद्ध यांचा काळ दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. यशोधरा यांचे जीवनचरित्र या नाटकाच्या निमित्ताने रसिक प्रेक्षकांना अनुभवता आले. जवळपास तीस कलावंताचा समूह असलेल्या या नाटकाने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
यात सुनील ढवळे, डॉ. भीमराव खाडे, डॉ. सुरेश शेळके, डॉ. भास्कर गायकवाड, डॉ. वर्षा सेलसुरेकर, यशवंत मकरंद, ज्योती धुतमल, आदित्य ढवळे, यश खंदारे, सुनील ढवळे, आरजू जाधव, साक्षी ढवळे, सोनी मुलंगे, मनस्वी ढवळे, योगिता खंदारे, राजनंदनी खंदारे, मनोरमा खंदारे, प्रियंका अवचार, अभिजित दीपंकर, यश खंदारे, शोभा वाटूडे, तन्मय ढवळे, संजीव आढागळे, प्रमोद अंभोरे इत्यादी कलावंतांनी भूमिका साकारल्या तर नेपथ्य : मिनाक्षी ढवळे, संगीत संयोजन : भूषण गाढे, प्रकाश योजना: राजेंद्र ताटे, रंगभूषा आणि वेशभूषा : कोमल आदोडे यांनी साकारली.
आज दि. १३ मार्च रोजी तन्मय ग्रुप, नांदेडच्या वतीने नाथा चितळे लिखित, दिग्दर्शित "२८ युगांपासून मी एकटी" या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण होणार आहे. दि.१४ मार्च रोजी झपूर्झा फाउंडेशन परभणीच्या वतीने विनोद डावरे लिखित-दिग्दर्शित "अस्वस्थ वल्ली" या नाट्य प्रयोगाने स्पर्धेची सांगता होणार आहे.