उस्माननगर परिसरात भक्तांनी माऊलींचे घेतले दर्शन -NNL


उस्माननगर, माणिक भिसे|
उस्माननगर व परिसरातील भाविक भक्तांनी  आज आषाढी एकादशी निमित्त गावोगावी वैष्णवांचा मेळा भरला . दरवर्षी प्रमाणे याही वर्षी माऊलींच्या भक्तांनी मंदिरामध्ये  विठ्ठल रखुमाईची विधिवत पूजा करून  दर्शन घेतले.उस्माननगर येथील वारकऱ्यांनी संत तुकाराम महाराज व विठ्ठल रखुमाई चे जयघोषात गावातून प्रदक्षिणा घालून दिंडी काढण्यात आली.

उस्माननगर येथील विठ्ठल मंदिरात सकाळ पासून भक्तांच्या रांगा लागल्या होत्या.मंदीरात भजन रंगले होते.झिमझिम पावसात गावातील प्रमुख मार्गाने येथील विठ्ठल मंदिरातील वारकऱ्यांनी  ज्ञानोबा माऊली तुकाराम....माऊली....माऊली...चा गजर करत पावसात विठ्ठल रखुमाई चे नमस्मरण करीत  दिंडी काढण्यात आली होती.परिसर टाळ मृदंग वीणा च्या निनादाने बहरला होता.यावेळी मोठ्या प्रमाणात वारकरी व भाविक उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी