नांदेड| अठराव्या शतकामध्ये १ जानेवारी १८४८ ला मुलींसाठी पहिली शाळा स्थापन करुन शिक्षणामध्ये अमुलाग्र क्रांती घडविणार्या सावित्रीमाई जोतीराव फुले यांच्या स्मृतींना उजाळा देऊन पालकांनी मुलींना शिकविणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले. ते दि. १० मार्च २०२२ गुरुवार रोजी सकाळी ठिक १० वाजता सावित्रीबाई जोतीराव फुले पूर्णाकृती पुतळा आयटीआय चौक नांदेड येथे सावता परिषद, माळी महासंघ व समता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानज्योती- राष्ट्रमाता विद्येची जननी, सावित्रीमाई फुले यांचा १२५ वा स्मृतीदिन अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
प्रमुख वक्ते म्हणून पुढे बोलताना श्री गुणवंत एच. मिसलवाड यांनी आपल्या भाषणात म्हणाले की, फुले दाम्पत्यांनी कोणाचीही मदत न घेता कोणाचीही पर्वा न करता मुलींसाठी एकूण १८ शाळा निर्माण करुन बालविवाहाला विरोध, स्त्री- पुरुष समानता, अज्ञानांना समानता, जातीभेदता नष्ट, चुल आणि मुल प्रथा बंद करुन संपूर्ण आयुष्य वेचले. अशा या महान कार्याचा व विचाराचा आदर्श घेऊन युवा- युवतींनी, मुलींनी शिकले पाहिजे ही काळाची गरज आहे, असे ते म्हणाले. व फुले दाम्पत्याला भारत सरकारने भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान मरणोप्रांत देण्याची मागणीही यावेळी त्यांनी केली.
यावेळी सर्वप्रथम सावता परिषदेचे नांदेड जिल्हाध्यक्ष मा. गोरखनाथ राऊत व माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष मा. लक्ष्मणराव जाधव, जेष्ठ नेते मा. रामचंद्र रासे (अण्णा) यांच्या हस्ते सावित्रीबाई जोतीराव फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सावता परिषदेचे नांदेड जिल्हाध्यक्ष मा. गोरखनाथ राऊत, माळी महासंघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष मा. लक्ष्मणराव जाधव, जेष्ठ नेते रामचंद्र रासे (अण्णा), सोशल मिडिया प्रमुख ज्ञानेश्वर गोरे, जिल्हा प्रवक्ते मारोती शितळे, महानगर सरचिटणीस कैलास शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी सर्व मान्यवरांची समयोचित भाषणे झाली.
यावेळी महामहीम राज्यपाल यांनी फुले दाम्पत्यांबद्दल अपशब्द काढल्याबद्दल सर्वानुमते त्यांचा निषेध करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुनील शिंदे यांनी केले तर आभार संदीप झांबरे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी रामप्रसाद रासे, रामेश्वर जाधव, आनंद जाधव, बजरंग रासे, बाबासाहेब सुतारे, प्रविण जेटीथोर यांनी सहकार्य केले.