उस्माननगर, माणिक भिसे| कंधार तालुक्यातील मौजे उस्माननगर येथील युवा कार्यकर्ते तथा आमदार श्यामसुंदर शिंदे यांचे निकटवर्तीय सिकंदर शेख यांची भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या उस्माननगर सर्कल प्रमुख पदी यांची निवड पुरोगामी युवक जिल्हाध्यक्ष योगेश पाटील नंदनवनकर यांनी एका पत्राद्वारे केली आहे.
नांदेड येथील आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या कार्यालयात २७ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात निवडीचे पत्र सिकंदर शेख यांना देण्यात आले. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय कार्याची दखल घेऊन सर्कल प्रमुख पदी निवड केली आहे. संघटनेचे ध्येय, धोरण, वाढ, विस्तार, प्रचार व प्रसार, संघटन करण्यासाठी जिल्हा सरचिटणीस योगेश पाटील नंदनवनकर यांनी शुभेच्छा देवून स्वागत केले आहे.
यावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे, यांनी कार्यकर्त्यांच्या उपस्थिती मध्ये सिकंदर शेख यांचे स्वागत करून भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या निवडीबद्दल शेख सिकंदर यांचे मित्र मंडळींकडून अभिनंदन व्यक्त केले जाते आहे.