कंधार, सचिन मोरे| दारिद्र्य निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय समाजरत्न गौरव पुरस्कार नांदेड येथील सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती अनुराधा व्यंकटी कपाळे यांना नुकताच प्रदान करण्यात आला.
अण्णा भाऊ साठे संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी व्हि . एन . कपाळे यांच्या श्रीमती अनुराधा कपाळे या पत्नी होत . कै . कपाळे यांच्या समवेत त्यांनी सामाजिक क्षेत्रात मोलाची कामगिरी केलेली असून त्यांच्या समाज कार्याची दखल घेत दारिद्र्य निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नांदेड येथे दि . २७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यस्तरीय समाजरत्न गौरव पुरस्कार स्व.सेनानी डॉ. दादारावजी वैद्य (आर्य) सभागृह नांदेड येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमेश भालेराव प्रमुख पाहुणे माजी आमदार गुरूनाथराव कुरुडे , रिपाई चे जेष्ठ नेते विजय सोनवणे, रणजीतसिंघ कामठेकर , वर्षाताई जमदाडे,छायाताई भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार सोहळा संपन्न झाला . त्यांना हा पुरस्कार मिळाल्या बद्दल सौ . रजनी घोडजकर , डॉ. विजयालक्ष्मी किणिकर , के . एन . कपाळे , प्रा . राजेश गायकवाड ,विलास जाधव , अॅड.ज्योती कपाळे, सचिन कपाळे , माधव कपाळे यांनी अभिनंदन केले.